‘जीएसटी’मुळे शेअर बाजारात तेजी परतली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 मे 2017

मुंबई: वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेने काल 1211 वस्तुंच्या कर दरावर निर्णय घेतला आहे त्याचे गुंतवणूकदारांनी स्वागत केले आहे. शेअर बाजारात कालच्या घसरणीनंतर आज (शुक्रवार) पुन्हा खरेदीच्या उत्साहामुळे तेजी संचारली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 210 अंशांनी वधारला असून 30,644.78 पातळीवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 58 अंशांनी वधारला असून 9,488.15 पातळीवर व्यवहार करतो आहे.

क्षेत्रीय पातळीवर एफएमसीजी निर्देशांक 3.52 टक्के, रिअल्टी 1.99 टक्के आणि मेटल 1.34 टक्क्यांनी वधारला आहे. तर आयटी निर्देशांक 0.67 टक्क्यांनी तर टेक निर्देशांक 0.33 टक्क्यांनी घसरला आहे.

सध्या मुंबई शेअर बाजारात आयटीसी, बडौदा बॅंक, येस बॅंक, ग्रासिम, एचयूएल, आणि एसबीआय यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले आहेत. तर आयशर मोटर्स, एशियन पेंट, टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रोच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.