टाटा मोटर्सची वाहने दोन लाखांनी स्वस्त

वृत्तसंस्था
बुधवार, 5 जुलै 2017

प्रत्येक मोटारीचे मॉडेल आणि व्हॅरिएंटनुसार मोटारीची किंमत 3,300 रुपये ते तब्बल 2 लाख 17 हजार रुपयांपर्यंत कमी होईल.

नवी दिल्ली: देशातील सर्वच वाहन कंपन्यांनी मोटारींच्या किंमती कमी करण्याचा सपाटा लावला आहे. आता टाटा मोटर्सने मोटारींच्या किंमती 12 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे.

प्रत्येक मोटारीचे मॉडेल आणि व्हॅरिएंटनुसार मोटारीची किंमत 3,300 रुपये ते तब्बल 2 लाख 17 हजार रुपयांपर्यंत कमी होईल.

याविषयी बोलताना प्रवासी वाहन व्यवसायाचे अध्यक्ष मयांक पारीख म्हणाले की, "केंद्र सरकारचा वस्तू व सेवा कर(जीएसटी) लागू करत देशभरात एकच कर लागू करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे देशात व्यवसायासाठी पोषक वातावरण निर्माण होईल, अर्थव्यवस्थेत नव्या युगाला प्रारंभ होईल आणि विशेषतः वाहन उद्योगाला उभारी मिळेल.  त्यामुळेच आम्ही ग्राहकांना जीएसटीचा संपुर्ण लाभ हस्तांतरित करणार आहोत. आम्ही वाहनांच्या किंमतींत 12 टक्क्यांनी कमी करणार आहोत. लोकांमध्ये खरेदीबाबत असलेला उत्साह पाहून आम्ही हा निर्णय घेतला आहे."

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:ञ
'जिओ' देणार 309 रुपयांत रोज 1 GB डेटा
बिअर आरोग्यासाठी उत्तम, सिद्ध करुन दाखवतो: आंध्रचे मंत्री
विट्यातील सर्व यंत्रमाग 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय​
गिरीश महाजन यांच्या बनावट 'पीए'ला अटक​
सत्ता केंद्रे गेली तरी राष्ट्रवादीत गटबाजीचा पिळ कायम !​
'जीएसटी' म्हणजे 'गई सेव्हिंग तुम्हारी' : राहुल गांधी​
भाजपच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा​

'आप का स्वागत हैं मेरे दोस्त,': इस्राईलकडून मोदींचे ऐतिहासिक स्वागत..!
शोध अण्वस्त्रविरहित जगाचा​
पंचविशीतली मराठी तरूणाई उद्योगाच्या वाटेवर!​
गाव पातळीवरील राजकारणाला वेगळं वळण... आता सरपंचही जनतेतून​