‘जीटीपीएल हॅथवे’चा आयपीओ आजपासून खुला

वृत्तसंस्था
बुधवार, 21 जून 2017

मुंबई: 'हॅथवे केबल अँड डेटाकॉम'ची उपकंपनी 'जीटीपीएल हॅथवे'ने प्राथमिक समभाग विक्रीच्या (इनिशिअल पब्लिक ऑफरिंग) आदल्यादिवशी काही प्रमुख(अँकर) गुंतवणूकदारांना 85.5 लाख शेअर्सची विक्री करुन 145.43 कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे. यामध्ये असाशिया बन्यान पार्टनर्स, गव्हर्नमेंट पेन्शन फंड ग्लोबल आणि बीएनपी परिबास म्युच्युअल फंडचा समावेश आहे. प्रतिशेअर 170 रुपयांप्रमाणे हे शेअरवाटप करण्यात आले आहे.

कंपनीच्या आयपीओला आजपासून(ता.21) सुरुवात होत आहे. यापुढे 23 जूनपर्यंत चालणाऱ्या विक्रीसाठी कंपनीने प्रतिशेअर 167 ते 170 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे.

प्रस्तावित योजनेत, कंपनी 240 कोटी रुपयांच्या नव्या शेअर्सची विक्री करणार आहे. याशिवाय, 'ऑफर फॉर सेल'द्वारे 1.44 कोटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे. यापैकी जीटीपीएल हॅथवेची पालक कंपनी हॅथवे केबल अँड डेटाकॉम 72 लाख शेअर्सची विक्री करणार आहे. हॅथवेकडे कंपनीच्या 50 टक्के अर्थात 4.92 कोटी शेअर्सची मालकी आहे. आयपीओतून मिळालेल्या भांडवलाचा उपयोग प्रामुख्याने कर्जाच्या परतफेडीसाठी केला जाणार आहे.

जीटीपीएल हॅथवेकडून पुणे, अहमदाबाद आणि कोलकातासह आणखी अनेक शहरांमध्ये केबल टीव्ही आणि ब्रॉडबँड सेवा पुरविल्या जातात. कंपनीला गेल्या आर्थिक वर्षात(2015-16) 852.1 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून 69 कोटी रुपयांचा नफा झाला होता.