‘एचसीएल’ची रु.3500 कोटींची शेअर बायबॅक योजना जाहीर

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मार्च 2017

नवी दिल्ली: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या संचालक मंडळाने 3,500 कोटी रुपयांच्या कोटींच्या शेअर बायबॅक योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. याअंतर्गत कंपनी सुमारे 3,500 कोटी रुपयांच्या साडेतीन कोटी शेअर्सचे बायबॅक करण्याचा प्रस्ताव आहे. यावर आता कंपनीचे भागधारक आणि इतर नियामक मंडळांची परवानगी घेतली जाणार आहे.

कंपनीच्या संचालक मंडळाने दोन रुपये दर्शनी मूल्य असणाऱ्या साडेतीन कोटी शेअर्सची पुन्हा खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. प्रतिशेअर एक हजार रुपयांप्रमाणे सुमारे 3,500 कोटी रुपयांना हा व्यवहार पार पडेल, अशी माहिती एचसीएलने मुंबई शेअर बाजारात सादर निवेदनात दिली आहे. शेअर बायबॅकचे नेमके वेळापत्रक वेळोवेळी जाहीर केले जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. एचसीएलमध्ये प्रवर्तकांची 59.69 टक्के हिस्सेदारी आहे.

आयटी कंपन्यांकडे सध्या रोखीचा साठा वाढत चालला असून भागधारकांना तसेच गुंतवणूकदारांना यात वाटा मिळावा या मागणीला प्रतिसाद अनेक कंपन्यांनी शेअर बायबॅक योजना हाती घेतली आहे. गेल्या महिन्यात टीसीएस आणि कॉग्निजंट या दोन बड्या कंपन्यांनी शेअर बायबॅक योजनेस मंजुरी दिली होती.

मुंबई शेअर बाजारात एचसीएलचा शेअर सध्या(10 वाजून 30 मिनिटे) 864.00 रुपयांवर व्यवहार करत असून 0.08 टक्क्याने वधारला आहे.