‘या’ कंपनीने वाढवल्या दुचाकींच्या किंमती

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मे 2017

नवी दिल्ली :देशातील सर्वात मोठी दुचाकी बनविणारी हीरो मोटोकॉर्पने विविध दुचाकींच्या किंमतीत 500 ते 2 हजार 200 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. उत्पादन घटकांच्या किंमतीत वाढ झाल्याने दुचाकींच्या किंमतीत वाढ करत असल्याचे हीरो मोटोकॉर्पने एका निवेदनात म्हटले आहे.

काल म्हणजेच 1 मेपासून हीरो मोटोकॉर्पच्या विविध दुचाकींच्या किंमतीत 500 ते 2 हजार 200 रुपयांची वाढ लागू करण्यात आली आहे. दुचाकी निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या हिरो मोटोकॉर्पने किंमतीत वाढ केल्याने आता इतर दुचाकी निर्माता कंपन्यांकडून देखील किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

हीरो मोटोकॉर्प सुरुवातीच्या श्रेणीतील एचएफ डॉन ते करिझ्मा झेडएमआर या दुचाकींची विक्री करते. हीरो मोटोकॉर्पच्या दुचाकींची 40 हजार रुपयांपासून 1 लाख रुपयांपर्यंत किंमती आहेत. सरलेल्या तिमाहीत कंपनीने विक्रीत 3.49 टक्क्यांची घसरण नोंदवली होती. 'मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लग्नकार्ये पार पडत असल्याने विक्रीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे," असे कंपनीकडून सांगण्यात आले.

सध्या मुंबई शेअर बाजारात हीरो मोटोकॉर्पचा शेअर 3351.25 रुपयांवर व्यवहार करत असून तो 40.55 रुपयांनी म्हणजेच 1.22 टक्क्यांनी वधारला आहे. दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरने वर्षभरात 2829 रुपयांची नीचांकी तर 3739.90 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.66,877.47 कोटींचे बाजारभांडवल आहे.