गृहकर्ज स्वस्त झाले हो!

गृहकर्ज स्वस्त झाले हो!

एसबीआयसह एचडीएफसी, आयसीआयसीआयकडून व्याजदरात घट
मुंबई - स्टेट बॅंकेने तिच्या गृहकर्जावरील व्याजदर पाव टक्‍क्‍यापर्यंत (0.25 टक्के किंवा 20 बीपीएस) कमी केले असून, महिलांसाठीही 8.35 टक्के दराने कर्ज देण्याची घोषणाही या वेळी करण्यात आली. याचसोबत खासगी क्षेत्रातील बॅंका एचडीएफसी आणि आयसीआयसीआयने महिलांसाठी 75 लाखांपर्यंतच्या कर्जावर 8.65 टक्के व्याजदर देण्याची घोषणा केली. साधारण वर्गासाठी 8.7 टक्के व्याजदर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्टेट बॅंकेने व्याजदर कमी केल्यानंतर अन्य व्यापारी बॅंकांनीही या निर्णयाचा कित्ता गिरवण्यास सुरवात केली आहे. गृहकर्जावरील व्याजदरकपातीचा लाभ बॅंकेचे 30 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना होणार आहे; तर 30 लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज घेणाऱ्यांना या व्याजदरकपातीमुळे साधारण 0.10 टक्‍क्‍यांपर्यंत (10 बीपीएस) फायदा मिळणार आहे. स्टेट बॅंकेची ही दरकपात योजना मर्यादित कालावधीसाठी असून, नवा वार्षिक 8.35 टक्के दर हा 31 जुलैपर्यंतच असेल. यामुळे स्टेट बॅंकेच्या कर्जदारांची मासिक हप्त्यात लाखामागे 530 रुपयांची बचत होईल.

गेल्या काही दिवसांत राज्यातील प्रमुख शहरांमधील गृहनिर्माण क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याचे चित्र आहे. जागतिक मंदी, गृहकर्जाचे वाढलेले व्याजदर आणि अलीकडच्या काळातील नोटाबंदी यामुळे हे क्षेत्र अद्यापही मंदीच्या गर्तेतच अडकलेले आहे. मात्र बॅंकांनी गृहकर्जाचे व्याजदर कमी केल्यास या क्षेत्रात सकारात्मक वातावरण तयार होण्यास मदत होईल.

घरांच्या खरेदीला चालना मिळेल, यासाठी अनुकूल स्थिती अद्याप आलेली नसून, त्यामागे गृहकर्जाचे व्याजाचे दर उच्च असणे मुख्य कारण असल्याचे एका संशोधनात समोर आले होते. गृहकर्जासाठी व्याजाचे दर गेल्या काही वर्षांमध्ये कमी झाले असले, कर्ज घेऊन घरांच्या खरेदीला ग्राहकांना प्रोत्साहित करतील इतके नसल्याचे सूत्रांचे म्हणने आहे.

'सर्वांसाठी घरा'ला चालना मिळणार
केंद्र सरकारच्या 2022 पर्यंत "सर्वासाठी घरे' या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे परवडण्याजोग्या गृहनिर्माणाला मोठी चालना मिळाली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाने या क्षेत्राला पायाभूत सुविधा क्षेत्राचा दर्जा देऊन सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. प्रत्यक्षात ही परवडण्याजोगी घरेही अपेक्षित ग्राहकवर्गाच्या खरेदी क्षमतेत बसत नाहीत, यावर या सर्वेक्षणाने शिक्कामोर्तब केले होते.

साधारण गटातील वेतनधारक कर्जदारांचा कर्जहफ्ता हा 0.20 ते 9.40 टक्‍क्‍यांपर्यंत करण्यात आला आहे; तसेच विनावेतनधारकांच्या हफ्त्याची सुरवात 0.15 टक्‍क्‍यांपासून होणार आहे. या व्याजदरांमुळे कर्जदात्यांचे ईएमआयवरील दरमाह 530 रुपयांची बचत होणार आहे. नव्या व्याजदरांची मंगळवारपासून (ता.9) अंमलबजावणी होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने 2022 पर्यंत "सर्वांसाठी घरे' ही योजना सत्यात उतरविण्यासाठी व्याजदरकपातीच्या घोषणेने बळ मिळेल.
- रजनीश कुमार, व्यवस्थापकीय संचालक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com