घर खरेदीसाठी आता ‘ईपीएफ’चे पैसे वापरा

वृत्तसंस्था
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

ईपीएफओ'ची नवी योजना लवकरच 

नवी दिल्ली : घर खरेदीसाठी पैशांची तजवीज करताना प्रत्येकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही अडचण लक्षात घेत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) "ईपीएफ'धारकांना घर खरेदीसाठी विशेष योजना आणण्याचे ठरविले आहे. यानुसार "ईपीएफ'धारकांना घर खरेदीसाठी त्यांच्या "ईपीएफ' खात्यातील रक्कम वापरता येईल.

पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर या योजनेची घोषणा केली जाण्याची शक्‍यता आहे. "ईपीएफ'धारकाच्या सेवा कालावधीत घर खरेदीसाठी ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कंपनीला आणि त्यांच्या "ईपीएफ'धारकांना गृहनिर्माण सोसायटीच्या धर्तीवर गट स्थापन करावा लागेल. या गटात किमान 20 कर्मचाऱ्यांचा समावेश आवश्‍यक आहे. हा गट विकसक आणि बॅंकांशी भागीदारी करेल. "ईपीएफ'धारकाला प्रधानमंत्री आवास योजनेचाही लाभ घेता येणार आहे. येत्या महिनाभरात ही योजना सुरू करण्यात येण्याची शक्‍यता आहे.

घर खरेदी करताना सुरवातीची आगाऊ रक्कम आणि मासिक हप्ता खातेधारकाला "ईपीएफ' खात्यातून देता येणार आहे. "ईपीएफ'धारकांच्या घर खरेदीमध्ये "ईपीएफओ' मध्यस्थ म्हणून काम करणार असली तरी कायदेशीर लढाईत "ईपीएफओ' सहभागी होणार नाही. कायदेशीर प्रकरणांत आगाऊ रक्कम आणि मासिक हप्ते गोठवण्याचे अधिकार "ईपीएफओ'कडे राहतील, असे सूत्रांनी म्हटले आहे.

Web Title: housing scheme: EPFO to launch housing scheme for over 4 crore members in March