कसे वापराल 'भिम' अॅप

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

केंद्र सरकारने कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत 'भारत इंटरफेस फॉर मनी' अर्थात 'भिम' मोबाईल ऍप्लिकेशन सादर केले आहे. जाणून घ्या या ऍप्लिकेशनबद्दलच्या काही ठळक बाबी:
  • वापरकर्ते आपल्या स्मार्टफोनवर गुगल प्ले स्टोअरवर जाऊन हे ऍप डाऊनलोड करु शकतात. 'आयओएस' ऑपरेटिंग सिस्टमवरदेखील हे ऍप्लिकेशन चालणार आहे.

  • एकदा मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाले की वापरकर्त्यांनी बॅंक खात्याचा क्रमांक टाकला की युपीआय पिन तयार होईल. यानंतर वापरकर्त्याचा मोबाईल नंबर हाच त्याचा 'पेमेंट ऍड्रेस' असेल. आर्थिक व्यवहारांसाठी वापरकर्त्यांना इंटरनेटची गरज भासणार नाही. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या ऍपवरुन पैशांची देवाण घेवाण सुरू करता येईल.
  • वापरकर्त्यांना एकमेकांच्या खात्यावर पैसे हस्तांतरित करण्यासाठी फक्त मोबाईल नंबरची गरज भासेल. विशेष म्हणजे, 'युनिफाइड पेमेंट इंटरफेस' (यूपीआय) ही पेमेंट प्रणालीचा अवलंब न करणाऱ्या बॅंकांच्या खात्यांमध्येदेखील पैसे पाठविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी त्या बॅंकेचा एमएमआयडी आणि आयएफएससी क्रमांक सादर करावा लागेल.
  • वापरकर्त्यांना केव्हाही आपल्या खात्यातील बॅलेन्स तपासून व्यवहार पार पाडता येईल. त्यासाठी आपल्या फोन नंबरव्यतिरिक्त एखादा कस्टम पेमेंट ऍड्रेस किंवा क्‍यूआर कोड सेट करता येईल.
  • या ऍप्लिकेशनद्वारे 24 तासांमध्ये किमान 10,000 तर जास्तीत जास्त 20,000 रुपयांचा व्यवहार शक्‍य आहे
  • वापरकर्त्यांना पैसे पाठविण्यासाठी कोणतेही व्यवहार शुल्क लावण्यात येणार नाही. परंतु बॅंकांकडून युपीआय किंवा आयएमपीएस शुल्क लागू केले जाऊ शकते. यावर सरकारचे नियंत्रण नसेल.
  • हे ऍप वापरण्यासाठी वेगळे जाऊन मोबाईल बॅंकिंग सुरू करण्याची गरज नाही.
  • सध्या हे ऍप्लिकेशन इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये उपलब्ध आहे.
Web Title: how to use bhim app