आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लॉंग टर्म प्लानला सर्वोत्तम मानांकन 

वृत्तसंस्था
सोमवार, 26 जून 2017

मुंबई : तब्बल 21 हजार कोटींच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करणाऱ्या आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लॉंग टर्म प्लानला "क्रिसिल'चे म्युच्युअल फंडाचे सर्वोत्तम मानांकन मिळाले आहे. तीन वर्षांत फंडातील 80 टक्के निधी सार्वभौम रोख्यांमध्ये गुंतवण्यात आला आहे. बेंचमार्कच्या तुलनेत या फंडाने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. 

या फंडातील गुंतवणूक सातत्याने वाढत आहे. "फंड हाऊस'कडून एक ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी चालू खात्याचे मॉडेल विकसित करण्यात आले आहे; ज्यात सीए इंडेक्‍स आणि सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यात येते. परिणामी पाच महिन्यांत या फंडात येणारा ओघ एक हजार कोटींवरून दोन हजार कोटी झाला आहे. दरम्यान, फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पूरक वातावरण आहे; मात्र अनिश्‍चिततेमुळे "डायनॅमिक फंड' योजनांमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर असल्याचे आयसीआयसीआय लॉंग टर्म प्लानचे फंड व्यवस्थापक मनीष बांठिया यांनी सांगितले.