"आयसीआयसीआय सिक्‍युरिटीज'चा "आयपीओ' 22 मार्चपासून खुला

"आयसीआयसीआय सिक्‍युरिटीज'चा "आयपीओ' 22 मार्चपासून खुला

पुणे:  आयसीआयसीआय सिक्‍युरिटीज लि.ने प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) करण्याचे ठरविले असून, कंपनीचा "आयपीओ' येत्या 22 मार्चपासून खुला होत आहे. ही समभागविक्री 26 मार्चपर्यंत चालणार आहे. या "आयपीओ'साठी कंपनीने रु. 519 ते रु. 520 असा किंमतपट्टा जाहीर केला आहे. किमान 28 आणि 28 शेअरच्या पटीत अर्ज करावा लागणार आहे.

शेअर, म्युच्युअल फंड, कॉर्पोरेट एफडी, बॉंड्‌स, एनपीएस आदी गुंतवणूक क्षेत्रातील आघाडीची ब्रोकिंग कंपनी म्हणून आयसीआयसीआय सिक्‍युरिटीज प्रसिद्ध आहे. या इश्‍यूच्या माध्यमातून पाच रुपयांच्या दर्शनी मूल्याचे 7,72,49,508 शेअर विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहेत. या इश्‍यूद्वारे कंपनीची प्रवर्तक असलेली आयसीआयसीआय बॅंक आपल्याकडील हिस्सा विकणार आहे. यात आयसीआयसीआय बॅंकेच्या शेअरधारकांसाठी राखीव कोटा ठेवण्यात आला आहे. कंपनीच्या शेअरची मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणी केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com