जिओला टक्कर देण्यासाठी आयडिया-व्होडाफोन एकत्र!

Idea-Vodafone announce merger
Idea-Vodafone announce merger

नवी दिल्ली - आयडिया आणि व्होडाफोन या प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी आपल्या विलीनीकरणाची अधिकृत घोषणा केली आहे. दोन्ही कंपन्यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या कंपनीला सुमारे 40 कोटींचा ग्राहकवर्ग प्राप्त होणार असून, ही दूरसंचार क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी ठरणार आहे. 

या कंपनीत व्होडाफोनला 45 टक्के हिस्सेदारीची मालकी मिळणार आहे. सुमारे 26 टक्के हिस्सेदारीवर आयडियाचा हक्क असणार आहे. दोन्ही कंपन्यांना संचालक मंडळावर प्रत्येकी तीन सदस्य नेमण्याचा अधिकार असेल. दूरसंचार क्षेत्राला मिळणाऱ्या उत्पन्नात सुमारे 43 टक्के वाटा मिळणार असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे. 

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओच्या आगमनाने दूरसंचार क्षेत्र धास्तावले आहे. या क्षेत्रातील इतर कंपन्यांनी आपापल्या पातळीवर जिओला टक्कर देण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. आयडिया आणि व्होडाफोनचे एकत्रीकरण हा त्याचाच भाग म्हणता येईल. त्याचप्रमाणे, भारती एअरटेलने गेल्या काही दिवसांपूर्वी टेलिनॉरचा व्यवसाय खरेदी करण्याची घोषणा केली होती. याशिवाय, रिलायन्स कम्युनिकेशन्स-एअरसेल-एमटीएस यांच्या संभाव्य विलीनीकरणात टाटा समुहाला निमंत्रण देण्यात आल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com