जेट एअरवेजवर ‘प्राप्तिकर’चे छापे 

जेट एअरवेजवर ‘प्राप्तिकर’चे छापे 

नवी दिल्ली - जेट एअरवेजच्या नवी दिल्ली आणि मुंबईतील चार कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने बुधवारी छापे घातले, अशी माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश गोयल यांच्या मालकीच्या जेट एअरवेजने बनावट हिशेबपत्रके दाखविल्याचा आणि निधीचा गैरवापर केल्याचा संशय आहे. तसेच, कंपनीने समूहातील कंपन्यांच्या नावाने बनावट खर्च दाखविल्याचाही संशय आहे. या प्रकरणी जेट एअरवेजच्या नवी दिल्ली आणि मुंबईतील चार कार्यालयांवर छापे घालण्यात आले. प्राप्तिकर विभागाच्या आजच्या कारवाईत सुमारे ५० अधिकारी सहभागी झाले होते. कंपनीच्या मुंबईतील अंधेरी आणि नरिमन पॉइंट येथील कार्यालयांवर छापे घालण्यात आले. कंपनीच्या आर्थिक अनियमिततेशी निगडित पुरावे शोधण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई आणखी दोन दिवस सुरू राहील. दरम्यान, जेट एअरवेजला गोदरेज बिल्डकॉनच्या व्यवहारात १७.२५ अब्ज रुपये मिळाले होते. याचाही तपास प्राप्तिकर विभाग तपास करीत आहे. जेट एअरवेज ९ ऑगस्टपासून कायम चर्चेत आहे. कंपनीने लेखा परीक्षकांसोबत झालेल्या वादातून तिमाही आर्थिक निकाल पुढे ढकलला होता. कंपनीला एप्रिल ते जून तिमाहीत १३.२६ अब्ज रुपयांचा तोटा झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com