सोने, चांदीला झळाळी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 एप्रिल 2018

मुंबई - अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सोने आणि चांदीच्या भावात बुधवारी वाढ झाली. जागतिक पातळीवर भावात घसरण होऊन स्थानिक बाजारपेठेत सोने आणि चांदीचे भाव वधारले. स्टॅंडर्ड सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम १३५ रुपयांची वाढ होऊन ३१ हजार २९० रुपयांवर गेला. शुद्ध सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम १३५ रुपयांनी वाढून ३१ हजार ४४० रुपयांवर पोचला. चांदीच्या भावात आज प्रतिकिलो ६२० रुपयांची वाढ होऊन तो ३९ हजार ५६५ रुपयांवर गेला. जागतिक पातळीवर सोन्याच्या भावात घसरण झाली. जागतिक वित्तीय बाजारपेठांमधील तेजी आणि डॉलर वधारल्यामुळे सोन्याच्या भावात घसरण झाली. सोन्याचा भाव प्रतिऔंस १ हजार ३४६ डॉलरवर आला.

मुंबई - अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सोने आणि चांदीच्या भावात बुधवारी वाढ झाली. जागतिक पातळीवर भावात घसरण होऊन स्थानिक बाजारपेठेत सोने आणि चांदीचे भाव वधारले. स्टॅंडर्ड सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम १३५ रुपयांची वाढ होऊन ३१ हजार २९० रुपयांवर गेला. शुद्ध सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम १३५ रुपयांनी वाढून ३१ हजार ४४० रुपयांवर पोचला. चांदीच्या भावात आज प्रतिकिलो ६२० रुपयांची वाढ होऊन तो ३९ हजार ५६५ रुपयांवर गेला. जागतिक पातळीवर सोन्याच्या भावात घसरण झाली. जागतिक वित्तीय बाजारपेठांमधील तेजी आणि डॉलर वधारल्यामुळे सोन्याच्या भावात घसरण झाली. सोन्याचा भाव प्रतिऔंस १ हजार ३४६ डॉलरवर आला. चांदीच्या भावात वाढ होऊन तो प्रतिऔंस १६.७८ डॉलरवर पोचला. 

Web Title: Increase in gold and silver prices

टॅग्स