आयआरबी इन्फ्राचा ‘इन्व्हिट’ फंड आजपासून खुला!

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

मुंबई: रस्ते विकास क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणार्‍या आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि.च्या देशातील पहिल्या पायाभूत गुंतवणूक विश्वस्त कोशाच्या म्हणजेच इन्व्हिट फंडाची उभारणी आजपासून (बुधवार) सुरू झाली आहे. आयआरबी इन्फ्राच्या ‘इन्व्हिट’ फंडसाठी 5 मेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

कंपनीने यासाठी रु.100 ते 102 किंमत पट्टा निश्चित केला आहे. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर इनवेस्टमेंट ट्रस्टने सेबीकडे 7 सप्टेंबर रोजी ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट सादर केले होते. सेबीकडे सादर केलेल्या डीआरएचपीनुसार इन्व्हिट फंडाच्या माध्यमातून कंपनीने रु.4300 कोटींचा निधी उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

इन्व्हिट फंडात गुंतवणूक कशी करता येते?
आपण ज्याप्रमाणे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतो त्याचप्रमाणे रिटेल गुंतवणूकदारांना इन्व्हिट फंडामध्ये गुंतवणूक करता येईल.
या इन्व्हिट फंडासाठी रु.102. दराने बोली लावता येणार आहे. मात्र किमान दहा हजार युनिट्ससाठी (किमान गुंतवणूक रु.10 लाख 20 हजार) अर्ज करावा लागेल आणि त्यापुढे पाच हजार युनिट्सच्या पटीत गुंतवणूक करावी लागेल. इन्व्हिट फंडातील युनिट्स मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणी करण्यात येतील. त्यामुळे शेअर बाजारातील शेअर्सप्रमाणे त्याचे खरेदी विक्रीचे व्यवहार करता येतील.

आज (बुधवार) मुंबई शेअर बाजारात आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर 267.80 रुपयांवर व्यवहार करत असून त्यात किरकोळ वाढ झाली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.8,947.92 कोटींचे बाजारभांडवल आहे. दहा रुपये दर्शनी किंमम असणार्‍या शेअरने वर्षभरात 177.50 रुपयांची नीचांकी तर 272.40 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे.