‘इंडिया ग्रिड ट्रस्ट’च्या नोंदणीला गुंतवणूकदारांचा थंड प्रतिसाद

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 जून 2017

शेअरची 100 रुपयांवर नोंदणी

मुंबई: इंडिया ग्रिड ट्रस्टच्या पायाभूत सुविधा विश्वस्त कोष म्हणजेच इन्व्हिट फंडाची आज(मंगळवार) शेअर बाजारात नोंदणी झाली. या फंडाची दोन्ही शेअर बाजारांमध्ये 100 रुपयांवर नोंदणी झाली. नोंदणीनंतर काही वेळातच फंडाच्या शेअरने साडेचार टक्क्यांच्या घसरणीसह 94 रुपयांवर नीचांकी पातळी गाठली.

स्टरलाइट पॉवरग्रिड व्हेंचर्स ही इंडिया ग्रिड ट्रस्टची पालक कंपनी आहे. वीज पारेषणाचे जाळे असणाऱ्या कंपनीने इंडिया ग्रिड ट्रस्टने प्रारंभिक हिस्साविक्रीतून रु.2250 कोटींचे भांडवल उभारले. या हिस्साविक्रीला गुंतवणूकदारांचा 1.35 पट अधिक प्रतिसाद मिळाला होता. कंपनीने समभाग खरेदीसाठी 98 ते 100 रुपये किंमतपट्टा निश्चित केला होता.

केंद्र सरकारने 2015 च्या अर्थसंकल्पात इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट म्हणजेच 'इन्व्हिट'च्या माध्यमातून निधी उभारण्यास परवानगी दिली होती. आपण ज्याप्रमाणे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतो त्याचप्रमाणे रिटेल गुंतवणूकदारांना इन्व्हिट फंडामध्ये गुंतवणूक करता येते. याआधी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरच्या देशातील पहिल्या इन्व्हिट फंडाने  शेअर बाजारात प्रवेश केला होता. ( देशातील पहिल्या 'इन्व्हिट फंड'चे बाजारात यशस्वी आगमन)

सध्या(12 वाजून 40 मिनिटे) इंडिग्रिड इन्व्हिट फंडाचा शेअर 98.59 रुपयांवर व्यवहार करत असून 1.41 टक्क्याने घसरला आहे.