'जीएसटी'त सोन्यावर 3 टक्के कर

पीटीआय
शनिवार, 3 जून 2017

नवी दिल्ली : वस्तू व सेवा कर रचनेत (जीएसटी) कररचनेत सोन्यावर तीन टक्के आकारण्यात येणार असून, खाण्याच्या बिस्किटांवर 18 टक्के कर असेल. याचबरोबर पाचशे रुपयांपेक्षा कमी किमतीच्या पादत्राणांवर पाच टक्के आणि त्यापेक्षा अधिक किमतीच्या पादत्राणांवर 18 टक्के कर असणार आहे.

जीएसटी समितीची बैठक अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झाली. या बैठकीला राज्यांचे अर्थमंत्री उपस्थित होते. बैठकीत सोने, पादत्राणे, कपडे, बिस्किटासह सहा वस्तूंवरील कराचे दर निश्‍चित करण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचशे रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या पादत्राणांवर पाच टक्के कर असेल आणि त्यापेक्षा जास्त किंमत असलेल्या 18 टक्के कर आकारण्यात येतील. सध्या पाचशे ते एक हजार रुपयांच्या पादत्राणांवर सहा टक्के उत्पादन शुल्क असून, त्यावर राज्ये मूल्यवर्धित करही आकारतात. तयार कपड्यांवर 12 टक्के, तर सुती कापड आणि सुती धाग्यावर पाच टक्के कर असेल. विडीवर 28 टक्के कर आकारण्यात येणार आहे. 

जीएसटी समितीने बाराशेहून अधिक वस्तू व पाचशे सेवांचे करदर 5, 12, 18 आणि 28 टक्‍क्‍यांची चौकटीत निश्‍चित केले आहे. समितीच्या आज झालेल्या 15 व्या बैठकीत सहा वस्तूंचे करदर निश्‍चित करण्यात आले. तसेच आज सुरवातीला राज्यांनी जीएसटीची 1 जुलैपासून अंमलबजावणी करण्याच्या नियमांवर सहमती दर्शविली. 

वस्तू : कर 

  • सोने : 3 टक्के 
  • बिस्कीट : 18 टक्के 
  • विडी : 28 टक्के 
  • तयार कपडे : 12 टक्के 
  • सुती धागे व कापड : 5 टक्के 
  • पादत्राणे (पाचशे रुपयांपेक्षा कमी किमतीची) : 5 टक्के 
  • पादत्राणे (पाचशे रुपयांपेक्षा अधिक किमतीची) : 18 टक्के