‘इंडियाबुल्स’च्या व्याजदरात 0.15 टक्क्याची कपात

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

मुंबई: इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सने विद्यमान कर्जधारकांसाठी व्याजदरात 0.15 टक्क्यांची कपात जाहीर केली आहे. यामुळे आता इंडियाबुल्स आणि एचडीएफसीच्या व्याजदराचे प्रमाण एकसारखे झाले आहे. नव्या महिला कर्जधारकांसाठी इंडियाबुल्सने महिन्याच्या सुरुवातीला व्याजदरांमध्ये 0.45 टक्क्यांपर्यंत कपात जाहीर केली होती.

"ग्राहकांचे चालू व्याजदर आणि कॉन्ट्रॅक्ट डेटनुसार नवे व्याजदर लागू केले जातील. बहुतांश दर हे किमान 8.9 टक्के तर कमाल 10.5 टक्क्यांदरम्यान हे दर असतील. तरीही बहुतांश ग्राहकांना नव्या दरांचा लाभ घेता येईल", असे कंपनीचे कार्यकारी संचालक सचिन चौधरी म्हणाले.

मुंबई शेअर बाजारात इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सचा शेअर सध्या(सोमवार, 11 वाजून 14 मिनिटे) 757.25 रुपयांवर व्यवहार करत असून 0.95 टक्क्याने वधारला आहे.

Web Title: indiabulls interest rate 0.15% cut