भारतीय कंपन्यांची 52 अब्ज डॉलरची गुंतवणूक 

पीटीआय
सोमवार, 26 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात भारतीय कंपन्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेत 52 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 

या वर्षी गुंतवणुकीचे प्रमाण वाढून विविध क्षेत्रांतील व्यवहारांना चालना मिळाली. व्यवसायवृद्धीचा हा आलेख आणखी उंचावण्याची शक्‍यता आहे. स्थानिक बाजारासोबत परकी बाजारांतही आशादायी वातावरण निर्माण होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. पायाभूत सुविधांमधील विकास आणि सुधारणा व दीर्घलक्षी आर्थिक प्रगतीकडे लक्ष दिल्यास हे उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होणार आहे. 

आर्थिक सल्लागार कंपनी 'ईवाय'च्या निरीक्षणानुसार 2016 मध्ये एकूण 52.6 अब्ज डॉलरचे व्यवहार झाले. 2015 मध्ये ते 31.3 अब्ज डॉलरवर होते. 2016 मध्ये व्यवहारांची संख्या घटली आहे. ती 756 राहिली. 2015 मध्ये एकूण 886 व्यवहार झाले होते. 'ईवाय'चे व्यवहार सल्लागार अजय अरोरा यांच्या म्हणण्यानुसार 2017 मध्ये अधिग्रहण आणि विलीनीकरणाचे व्यवहार सकारात्मक राहतील. आर्थिक आणि धोरणात्मक निर्णयामुळे गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्‍वास वाढत आहे. विशेषत: औद्योगिक, जैवशास्त्र, वित्तीय सेवा अशा क्षेत्रांत अधिकाधिक गुंतवणुकीची शक्‍यता आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर व्यवहार घटू शकतील; मात्र आगामी वर्षांत मध्यम आणि दीर्घकाळासाठी नोटाबंदी आणि जीएसटीचा व्यवहारांना फायदा होणार आहे.

अर्थविश्व

बंगळूर - इन्फोसिसचे संचालक मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांच्या राजीनाम्याला सहसंस्थापक एन. आर. नारायणमूर्ती जबाबदार...

12.12 PM

मुंबई - खरेदीसाठी पूरक वातावरण निर्माण झाल्याने संस्थात्मक आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी मंगळवारी (ता. २२) खरेदीवर भर दिला. यामुळे...

08.51 AM

संपामुळे देशभरातील बॅंकांची सेवा कोलमडली मुंबई - खासगीकरण आणि विलीनीकरणाविरोधात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता.२२)...

08.51 AM