'महिलांच्या आर्थिक सहभागामुळे उत्पन्न 27 टक्क्यांनी वाढेल'

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

महिलांना जास्तकरुन अनौपचारिक क्षेत्रातूनच रोजगार उपलब्ध होतो. औपचारिक क्षेत्रात नोकरी मिळालीच तर पुरुषांएवढेच शिक्षण असूनदेखील सरासरी तीन तिमाहींनी कमी उत्पन्न मिळते

लॉस एंजेलिस: भारतातील मनुष्यबळात महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढीस लागला तर देशाच्या उत्पन्नात तब्बल 27 टक्क्यांची वाढ होईल, असे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या(आयएमएफ) व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्तीन लॅगार्ड यांनी व्यक्त केले. महिलांना समान वेतन आणि चांगल्या आर्थिक संधी उपलब्ध झाल्यास देशाच्या आर्थिक वाढीस चालना मिळेल असेही त्या म्हणाल्या.

लॉस एंजेलिस येथे 'महिला सबलीकरण: आर्थिक गेमचेंजर' या विषयावर संबोधित करताना लॅगार्ड म्हणाल्या की, "महिला सबलीकरणाने कोणत्याही देशातील आर्थिक परिस्थिती लक्षणीय बदल घडून येईल. मनुष्यबळात महिलांचा पुरुषांएवढा सहभाग वाढीस लागला तर अमेरिकेचे राष्ट्रीय उत्पन्न 5 टक्के, जपानचे 9 टक्के तर भारताचे 27 टक्क्यांनी वाढेल".

महिलांना मनुष्यबळात समान स्थान प्राप्त झाल्यास आर्थिक विषमता नष्ट होऊन विविधतादेखील वाढीस लागेल. काम करण्यास योग्य वयातील एकुण महिलांपैकी केवळ 50 टक्के महिलांना सध्या रोजगार उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.

"महिलांना जास्तकरुन अनौपचारिक क्षेत्रातूनच रोजगार उपलब्ध होतो. औपचारिक क्षेत्रात नोकरी मिळालीच तर पुरुषांएवढेच शिक्षण असूनदेखील सरासरी तीन तिमाहींनी कमी उत्पन्न मिळते", असे धक्कादायक निरीक्षण त्यांनी नोंदविले.

यासाठी प्रत्येक देशातील सरकारने पुढाकार घेण्याची गरज लॅगार्ड व्यक्त केली. आर्थिकदृष्ट्या परवडणारे बालसंगोपन, पालकत्व रजा आणि लवचिक कार्यपद्धतीला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. त्याचप्रमाणे महिलांसमोरील कायदेशीर अडथळे दूर करुन त्यांचा मनुष्यबळात समावेश करुन घ्यायला हवा असेही त्या म्हणाल्या.

अर्थविश्व

विविध स्तरातील ग्राहकांच्या वाढत्या मागणीसह पुणे शहर रिअल इस्टेट क्षेत्रातील डेस्टिनेशन कसे ठरले यावर सध्याच्या ...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

मुंबई - इन्फोसिसमधील नाट्यमय घडामोडी आणि जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी विक्रीचा पवित्रा...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली - वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायद्यांतर्गत ज्या व्यायसायिकांची व्यावसायिक उलाढाल २० लाखांच्या आत असूनही त्यांनी...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017