ऑक्‍टोबरमध्ये महागाईत घसरण; महागाईदर 3.39 टक्‍क्‍यांवर

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - ऑक्‍टोबर महिन्यात देशाच्या घाऊक किंमत निर्देशांकावर (Wholesale Price Index) आधारित चलनवाढ 3.39 टक्‍क्‍यांवर पोचल्याने ऑक्‍टोबरमध्ये महागाई दर चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोचला आहे. सप्टेंबर महिन्यात हा दर 3.57 टक्के नोंदवण्यात आला होता.

महागाई दर कमी झाला असला तरीही अन्नधान्याच्या किंमतीत मात्र घसरण झाली आहे. सप्टेंबर महिन्यात अन्नधान्य किंमत निर्देशांक 5.75 टक्के होता. तर ऑक्‍टोरबमध्ये तो 4.34 टक्‍क्‍यांवर पोचला. प्राथमिक वस्तूंचा दर 4.76 टक्‍क्‍यांवरून कमी होऊन तो 3.31 टक्‍क्‍यांवर पोचला आहे. भाज्यांच्या दरात देखील घसरण झाल्यामुळे निर्देशांक -10.91 टक्‍क्‍यांवरून -9.97 टक्‍क्‍यावर पोचला आहे. डाळींच्या महागाई निर्देशांकात किंचित घसरण झाली आहे. तो निर्देशांक आता 23.99 टक्‍क्‍यांवरून कमी होऊन 21.8 टक्‍क्‍यांवर पोचला आहे.

पाचशे आणि हजारच्या नोटा बंद झाल्यामुळे काळ्या पैशावर नियंत्रण मिळविण्यात काही अंशी यश मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर नोव्हेंबरमधील महागाई दर आणखी खाली येण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Inflation rate down