देना बॅंकेकडून व्याजदरात कपात

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 जून 2017

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील देना बॅंकेने "एमसीएलआर'नुसार व्याजदरात कपात केली आहे.

बॅंकेने एक महिन्यासाठीचा व्याजदर 0.20 टक्‍क्‍याने कमी करून 8.25 टक्के केला आहे. तीन महिन्यांसाठीचा दर 8.50 टक्‍क्‍यांवरून 8.40 टक्के केला आहे.

सहा महिन्यांसाठी आणि एक वर्षासाठीचा एमसीएलआर 0.5 टक्‍क्‍यांनी कमी केला आहे. सहा महिन्यांसाठी 8.50 टक्के आणि एक वर्षासाठी एमसीएलआर दर 8.60 टक्के राहील, असे बॅंकेने म्हटले आहे. दरम्यान भारतीय स्टेट बॅंकेने मात्र एमसीएलआरवरील व्याजदर जैसे थे ठेवला आहे.