शेअर बाजाराला आंतरराष्ट्रीय घडामोडींचे ग्रहण

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 मे 2017

मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारातील नकारात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराची विक्रमी वाढ मागे पडली आहे. याव्यतिरिक्त रुपयातील घसरण, जीएसटी दराविषयी चर्चा आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या निकालांमुळे निर्देशांकांत आणखी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सुमारे 200 अंशांनी कोसळला असून निफ्टीने 9500 अंशांची पातळी मोडली. रुपयानेदेखील आठवडाभराची नीचांकी पातळी गाठली आहे. रुपया आज 22 पैशांच्या घसरणीसह 64.37 रुपये प्रति डॉलरएवढे झाले आहे.

सध्या(10 वाजून 20 मिनिटे) सेन्सेक्स 30,507.37 अंशांच्या पातळीवर व्यवहार करत असून 151.40 अंशांनी कोसळला आहे. दरम्यान, निफ्टी 9,460.10 अंशांच्या पातळीवर व्यवहार करत असून 65.65 अंशांनी कोसळला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेडरल चौकशीत हस्तक्षेप करीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर वॉल स्ट्रीटवरील निर्देशांकात घसरण झाली. परिणामी, भारतासह इतर आशियाई शेअर बाजारांमध्येदेखील पडझड सुरु झाली. ट्रम्प यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांना एका भेटीदरम्यान दहशतवादी संघटना इसिससंबंधी गोपनिय माहितीचा खुलासा केल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे. जी माहिती अमेरिका मित्र देशांनाही देत नाही. ती ट्रम्प यांनी रशियाला दिल्याचा आरोप यासंबंधी प्रसिद्ध झालेल्या वृत्तात करण्यात आला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे.

भारतीय शेअर बाजारातील सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये घसरण झाली आहे. बँक निफ्टी 0.6 टक्क्याने घसरला आहे. याशिवाय, ऑटो, एफएमसीजी, मेटल, फार्मा, रिअल्टी, कॅपिटल गूड्स, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि वीज क्षेत्रात सर्वाधिक विक्रीचा मारा सुरु आहे.

निफ्टीवर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, बडोदा बँक, टेक महिंद्रा, विप्रो आणि कोल इंडियाचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर हिंडाल्को, येस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, अंबुजा सिमेंट्स आणि लार्सेनचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत.