गुंतवणुकीची संधी: ‘एयू स्मॉल फायनान्स बॅंके’चा आयपीओ आजपासून खुला

वृत्तसंस्था
बुधवार, 28 जून 2017

मुंबई: एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या प्राथमिक समभाग विक्रीला (इनिशिअल पब्लिक ऑफरिंग-आयपीओ) आजपासून सुरूवात होत आहे. आजपासून (ता.28) पुढील दोन दिवस म्हणजे 30 जूनपर्यंत एयू स्मॉल फायनान्स बॅंकेच्या आयपीओसाठी अर्ज करता येणार आहे. कंपनीने प्रतिशेअर 355 ते 358 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे. गुंतवणूकदारांना किमान 41 शेअर्स खरेदी करावे लागतील. यापेक्षा अधिक शेअर्स खरेदी करावयाचे असल्यास ही संख्या 41 च्या पटीत असावी. एका शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे.

कंपनीच्या प्रारंभिक हिस्साविक्री योजनेत विद्यमान भागधारक 'ऑफर फॉर सेल'द्वारे सुमारे 5.34 कोटी शेअर्सची विक्री करतील. यामध्ये इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन, वॉरबग पिंकस, ख्रिसकॅपिटल आणि केदारा कॅपिटलचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेकडून लघुवित्त बँकेचा परवाना मिळालेल्या कंपन्यांमध्ये एयू स्मॉल फायनान्स बँकेचादेखील समावेश आहे. ईक्विटास आणि उज्जीवननंतर शेअर बाजारात सूचीबद्ध होणारी तिसरी स्मॉल फायनान्स बँक असेल.