करूया ‘एसआयपी’चा श्रीगणेशा!

Investment
Investment

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात ‘एसआयपी’ हा शेअर बाजारात प्रवेश करण्याचा अत्यंत सोपा, कमी जोखीम असलेला आणि दीर्घकाळामध्ये चांगले फायदे देणारा पर्याय आहे, हे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. मात्र, दुर्दैवाने गुंतवणुकीचा हा उत्तम पर्याय आपल्याकडील सर्वसामान्य गुंतवणूकदारांपर्यंत अजूनही पुरेशा प्रमाणात पोचलेला नाही. 

शेअर बाजारात ‘भीती आणि लोभ’ हे सर्वांत मोठे शत्रू आहेत. त्या शत्रूंवर ‘एसआयपी’ गुंतवणूकदार मात करू शकतो. ‘एसआयपी’च्या मार्गाने गुंतवणूक केल्यास बाजाराची स्थिती अजिबात न पाहता गुंतवणूकदार शांतपणे आणि शिस्तबद्धपणे बाजारात प्रवेश करत राहतो. त्यामुळे आपोआप तो भीती आणि लोभ या शत्रूंवर मात करू शकतो. जागा, फ्लॅट, सोने, एफडी आदी पर्यायात गुंतवणूक करताना खूप दूरचा विचार करणारे लोक ‘एसआयपी’च्या बाबतीत मात्र अतिशय कमी कालावधीचा विचार करतात.

थोडक्‍यात, ‘एसआयपी’कडे बघण्याचा दृष्टिकोन अनेक वेळा चुकीचा असतो. त्यामुळे या चांगल्या पर्यायाचा उपयोग नीट प्रकारे होत नाही. अर्थात, योग्य म्युच्युअल फंड योजनेची निवड करणे हेदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची मदत घेणे हितावह असते. अशा प्रकारे ज्या गुंतवणूकदारांनी दीर्घकाळासाठी (पाच, सात, दहा वर्षे) ‘एसआयपी’ केली आहे, त्यांना उत्तम परतावा मिळालेला आहे, असे इतिहास सांगतो. त्यामुळे बाजारातील तात्पुरत्या चढ-उतारांकडे दुर्लक्ष करीत जेवढी जास्त काळ ‘एसआयपी’ केली जाते, तेवढा जास्त फायदा मिळण्याची शक्‍यता असते.

अलीकडच्या काळात शेअर बाजारातील चढ-उतारांमुळे अस्वस्थ झालेल्या गुंतवणूकदारांना कधी राष्ट्रीय, तर कधी आंतरराष्ट्रीय स्तरावरून नवनव्या बातम्यांचे धक्के बसत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात शेअर बाजारात घसरण झाली, तरी ‘एसआयपी’च्या गुंतवणूकदारांनी काळजी करण्याचे कारण नसावे. कारण घसरत्या बाजारात कमी भावात (एनएव्ही) जास्त युनिट्‌स मिळत जातात. 

नव्या आर्थिक वर्षाचे पहिले सहा महिने आता संपत आले आहेत. अजूनही ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवणुकीला सुरवात केली नसेल, तर गणेशोत्सवाचे निमित्त साधून त्याचा श्रीगणेशा करा!  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com