तरुणांनो आयुष्याचे करा 'सोने'

गौरव मुठे
मंगळवार, 21 मार्च 2017

तरुण एकदा विवाह बंधनात अडकल्यानंतर त्यांच्या गुंतवणुकीचा प्राधान्यक्रम बदलतो. जसे की फिक्‍स्ड डिपॉझिट, पोस्टाचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, एलआयसी पॉलिसी इत्यादी होतात.

तारुण्याचा काळ हा जीवनाचा सुवर्णकाळ असतो त्यामुळे आत्ताच स्वत:ला आर्थिक शिस्त लावून उत्तम निर्णय घ्यायला सुरवात करा. सध्याची तरुण पिढी भविष्याच्या बाबतीत अधिक सजग झाली आहे. तेव्हा भवितव्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करण्यास सुरूवात करा.

तरुण उमेदीच्या काळात अधिक जोखीम घेऊ शकतात. त्यामुळे शेअर बाजारात येण्याचा 'श्री गणेशा' तरुणपणीच केला पाहिजे. शेअर बाजारात इतर आर्थिक साधनांच्या तुलनेत अधिक जोखीम असते. मात्र प्रत्येकाने वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगळी जोखीम घ्यावयाची असते. म्हणजेच तरुण एकदा विवाह बंधनात अडकल्यानंतर त्यांच्या गुंतवणुकीचा प्राधान्यक्रम बदलतो. जसे की फिक्‍स्ड डिपॉझिट, पोस्टाचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, एलआयसी पॉलिसी इत्यादी होतात.

शेअर बाजारात तरुण अगदी पाचशे रुपयांपासून गुंतवणुकीचा 'श्री गणेशा' करू शकतात. आतापर्यंत शेअर बाजारात दीर्घकाळात कधीही गुंतवणूकदारांचे कधीही नुकसान झालेले नाही. यामुळे आधुनिक गुंतवणूकदार बनून इक्विटी, म्युच्युअल फंड यांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही आयुष्यातील आर्थिक लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करू शकता. याच निधीचा उपयोग करून तुम्ही उद्योजक बनू शकतात. त्यामुळे तरुणांनो सोने करा आयुष्याचे...!!!

Web Title: investment tips for youth by gaurav muthe