‘जेट एअरवेज’कडून तिकीटासाठी ‘ईएमआय’चा पर्याय

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

नवी दिल्ली: अनेक विमान वाहतुक कंपन्या ग्राहकांना भुरळ घालतील अश्या विविध सवलती जाहीर करत आहेत. विमान प्रवासाच्या दरात कपात करण्याचा विमान वाहतुक कंपन्यांमध्ये सध्या चढाओढच सुरू झाली आहे.

'जेट एअरवेज'ने ईएमआयवर आधारित तिकीट विक्रीची घोषणा केली आहे. यासाठी मुंबई-मुख्यालय असलेल्या जेट एअरवेजने ऍक्सिस बँक, एचएसबीसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक अशा बँकांसोबत करार केला आहे.

जेट एअरवेजच्या ग्राहकांना तिकिटाचे बुकिंग करताना 3, 6, 9 आणि 12 महिन्यांचे ईएमआयचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे. नोटबंदी नंतर वाढलेल्या भारतीय ग्राहकांचा वाढलेला ऑनलाइन वापर देखील यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

सध्या मुंबई शेअर बाजारात जेट एअरवेजचा शेअर 355.95 रुपयांवर व्यवहार करत असून त्यात किरकोळ वाढ झाली आहे. दहा रुपये दर्शनी किंमत असलेल्या शेअरने वर्षभरात 336 रुपयांची नीचांकी तर 783.30 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.4,041.23 कोटींचे बाजारभांडवल आहे आहे.

अर्थविश्व

नवी दिल्ली : इन्फोसिसच्या मंडळाने आज 13 हजार कोटी रुपयांच्या "शेअर बायबॅक' योजनेला मान्यता दिली. "इन्फोसिस'चे मुख्य कार्यकारी...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

मुंबई : इन्फोसिसच्या संचालक मंडळाने आज (शनिवार) तब्बल 13 हजार कोटी रूपयांचे समभाग 'बायबॅक' करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली....

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

मुंबई : मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांच्या नाट्यमय राजिनाम्यानंतर 'इन्फोसिस' कंपनीसमोर आणखी एक डोकेदुखी उभी राहिली आहे...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017