राकेश झुनझुनवालांकडून टाटांच्या ‘या’ कंपनीतील हिस्सेदारीची विक्री

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 मे 2017

मुंबई: भारतीय शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी टाटा मोटर्स डीव्हीआरच्या शेअर्सची विक्री केली आहे. झुनझुनवाला यांनी 50 लाख शेअर्सची सुमारे रु.133 कोटींना विक्री केली आहे.एनएसईकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, झुनझुनवालांनी सरासरी 266.5 प्रतिशेअरप्रमाणे 50 लाख शेअर्सची विक्री केली आहे.

सध्या मुंबई शेअर बाजारात टाटा मोटर्स डीव्हीआरचा शेअर 266.95 रुपयांवर व्यवहार करत असून त्यात 4 रुपयांची घसरण झाली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.8,578.68 कोटींचे बाजारभांडवल आहे.

टाटा मोटर्स (डीव्हीआर) ‘निफ्टी’त 51वा

टाटा मोटर्सचा (विशेष मताधिकार- डिफरन्शियल व्होटिंग राइट्स) असलेल्या शेअर्सच्या समावेशाने या निर्देशांकात सामील कंपन्या जरी 50 असल्या तरी ती गेल्यावर्षीपासून 51 झाली आहे

Web Title: Jhunjhunwala sells Tata Motors DVR shares worth over Rs 133 cr