Hurry Up, जिओ फोन वाट बघतोय !

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

जिओ फोनसाठी 1500 रुपयांची सुरक्षा ठेव जमा करावी लागणार आहे. मात्र सुरुवातीला नोंदणी करताना 500 रुपये भरावे लागणार आहेत. उर्वरित 1000 रुपये मोबाइल मिळाल्यानंतर भरावे लागणार आहेत.

मुंबई: 'रिलायन्स जिओ'चा बहुचर्चित जिओ फीचर फोनसाठी आज (गुरुवार) संध्याकाळपासून प्री-बुकिंग सुरू होणार आहे. त्यामुळे आज फीचर फोन बुक करण्यासाठी सुरुवातीला 500 रुपये भरावे लागणार आहे. जिओच्या रिटेलरकडे देखील पैसे भरून फोन बुक करता येणार आहे.

जिओ फोनसाठी 1500 रुपयांची सुरक्षा ठेव जमा करावी लागणार आहे. मात्र सुरुवातीला नोंदणी करताना 500 रुपये भरावे लागणार आहेत. उर्वरित 1000 रुपये मोबाइल मिळाल्यानंतर भरावे लागणार आहेत.

जिओच्या 'जिओ.कॉम' या संकेतस्थळावर आपली प्राथमिक माहिती भरून 'प्री बुकिंग' सुरू करता येणार आहे. संकेतस्थळावर आपले नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी द्यावा लागणार आहे. ही प्राथमिक माहिती दिल्यानंतर रिलायन्स जिओच्या जी फीचर फोनसाठी 'रजिस्ट्रेशन' होऊ शकणार आहे.

'प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर सप्टेंबरपासून या फोनची प्रत्यक्ष विक्री केली जाणार असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले.

असा करा फोन बुक:
जिओ फोनच्या बुकिंगसाठी दुकानांच्या रांगते उभे रहायचे नसेल तर आपण घरबसल्याही जिओ फोन बुक करु शकता. त्यासाठी तुम्हाला केवळ एक मेसेज करावा लागेल. जिओ फोन बुक करण्यासाठी मेसेज बॉक्समध्ये जाऊन ‘ज्प> तुमचा पिनकोड> जवळच्या जिओ स्टोअरचा कोड’ 7021170211 या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला कंपनीकडून 'थॅंक यू' असा रिप्लाय येईल. याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार ग्राहकाचा हा मेसेज कंपनीला मिळताच फोनविषयी संपूर्ण माहिती जिओकडून कॉल करुन ग्राहकाला दिली जाणार आहे.

कसे कराल रिलायन्स जिओच्या फोनचे रजिस्ट्रेशन?

  • रिलायन्स जिओच्या फोनचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी जिओच्या अधिकृत संकेतस्थळावर (जिओ.कॉम) वर जा.
  • होम पेजवर तुम्हाला जिओ स्मार्टफोनचे बॅनर दिसेल.
  • 'किप मी पोस्टेड' वर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन पेजवर पोचाल.
  • येथे नाव, आडनाव, मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडी द्यावा
  • वरील सर्व माहिती दिल्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण होईल
  • रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण दिलेल्या मोबाईल क्रमांकावर जिओकडून एक संदेश येईल.
  • उद्यापासून जिओच्या फोनसाठी प्री-बुकिंग सुरू होणार आहे.
  • सप्टेंबरपर्यंत ग्राहकांना फोन मिळणार आहे. दर आठवड्याला 5 लाख फोन उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे जिओकडून सांगण्यात आले.
  • अंबानींनी म्हटल्याप्रमाणे हा फोन ''प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य'' या तत्त्वावर दिला जाणार आहे.

रिलायन्स जिओचा फोन बुक करण्यासाठी इतर मार्ग:
मायजियो अॅप किंवा जिओ रिटेलरमार्फत फोन बुक करता येणार आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :