खादी ग्रामोद्योगमध्ये आता कैद्यांची उत्पादने

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 मार्च 2017

नवी दिल्ली: तिहारसह अन्य कारागृहांतील कैद्यांनी बनविलेली उत्पादने आता देशभरातील खादी ग्रामोद्योगच्या दालनांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष व्ही. के. सक्‍सेना म्हणाले, ""कैद्यांनी बनविलेल्या उत्पादनांची विक्री करून त्यांच्यात बदल आणि सामाजिक सर्वसमावेशकता निर्माण होईल. तिहार आणि गुडगावमधील कैद्यांनी बनविलेली उत्पादने विकण्यास खादी ग्रामोद्योगच्या दालनांमध्ये लवकरच सुरवात होणार आहे. त्यानंतर अन्य कारागृहांतील कैद्यांनी बनविलेली उत्पादने विक्रीस ठेवण्यात येतील.''

कैद्यांनी बनविलेल्या उत्पादनांमध्ये तयार कपडे, हस्तकला वस्तू, गृह फर्निचर, ब्लॅंकेट, स्टेशनरी वस्तूंचा समावेश आहे. ही उत्पादने विकण्याचा निर्णय साबरमती आश्रमात नुकत्याच झालेल्या खादी ग्रामोद्योगच्या बैठकीत घेण्यात आला. विणकरांचे वेतन वाढविण्यासोबत बंद पडलेल्या खादी संस्था सुरू करण्याचा ठरावही यात करण्यात आला.

Web Title: khadi gramodyog jail products