एलआयसीचा पश्‍चिम विभाग 2017-18 मध्ये आघाडीवर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

पुणे : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) पश्‍चिम विभागीय कार्यालयाने व्यक्तिगत विमा हप्त्याच्या नवीन व्यवसायात आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या आर्थिक वर्षात पश्‍चिम विभागात नव्या ३४ लाख ६३ हजार ५८२ पॉलिसी काढण्यात आल्या आहेत. यातून ९ हजार २ कोटी रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळ स्थापन झाल्यापासून प्रथमच एखाद्या विभागाने एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्या पॉलिसींमधून पहिला हप्ता मिळविला आहे. एलआयसीचे आठ विभाग असून, एकूण विमा हप्त्यातील उत्पन्नात पश्‍चिम विभागाचा वाटा २१ टक्के आहे. या विभागाचे नेतृत्व विभागीय व्यवस्थापक विपिन आनंद यांच्याकडे आहे. आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहामाहीत नव्या उत्पादनांच्या विक्रीत विभागाची कामगिरी चांगली आहे. जीवन शिरोमणी आणि बिमा श्री या योजनांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जीवन अक्षय ६ या निवृत्तिवेतन योजनेची विक्रीही चांगली झाली आहे. निवृत्तिवेतन आणि सामूहिक विमा यामध्ये विभागाने चांगली कामगिरी नोंदविली आहे. पश्‍चिम विभागांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, गोवा ही राज्ये आणि दमण व दीव हे केंद्रशासित प्रदेश आहेत. या कामगिरीविषयी बोलताना विभागीय व्यवस्थापक विपिन आनंद म्हणाले, की देशाच्या कानाकोपऱ्यांत आणि प्रत्येक नगारिकापर्यंत पोचण्याचा आमचा उद्देश आहे. यादृष्टीने आमची सध्या वाटचाल सुरू आहे. मागील वर्षातील चांगल्या कामगिरीमुळे आम्ही उत्कृष्ट सेवा देण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहोत. नवे व्यवसाय आणि सेवा ग्राहकांना चांगल्या पद्धतीने देण्यावर भर देण्यात येणार आहे.

Web Title: LIC's West Zone is leading in 2017-18