पंचवीस वर्षांपासून ब्रिटनमध्ये राहतो : मल्ल्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 जुलै 2017

लंडन: मी गेल्या पंचवीस वर्षांपासून ब्रिटनमध्ये राहतो, असा अजब दावा मद्यसम्राट विजय मल्ल्या याने केला. ब्रिटनच्या वेस्टमिन्सटर न्यायालयात प्रत्यार्पणासंदर्भातील खटल्याच्या सुनावणीसाठी मल्ल्या हजर झाला होता. सुनावणी संपवून बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी घेरले असता मल्ल्याने हा अजब दावा केला.

याबाबत पत्रकारांनी मल्ल्याला मुंबई उच्च न्यायालयाने जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटबद्दल, तुमचे म्हणणे काय आहे, असा प्रश्‍न विचारला. त्यावर मला काहीच बोलायचे नसल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, त्यानंतर एका महिला पत्रकाराने तुम्ही भारतीय न्यायालयापासून पळत का आहात? तुम्ही त्या ठिकाणी सुनावणीसाठी हजर का राहत नाही? तुम्ही भारताला अनेक कोटींचे देणे लागता त्याचे काय? असे प्रश्‍न विचारल्यावर "मी ब्रिटनमध्ये 1992 पासून राहत आहे,' असे अजब उत्तर मल्ल्याने दिले.
मल्ल्याने पंचवीस वर्षांपासून ब्रिटनमध्ये राहात असल्याचे सांगून अप्रत्यक्षपणे आपण भारतीय न्यायालयापासून पळत नसल्याचे सूचित केले. दरम्यान, प्रत्यापर्णाच्या या खटल्याची पुढील सुनावणी 14 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.