जीएसटीचा फटका; सिलिंडर 32 रुपयांनी महाग

वृत्तसंस्था
सोमवार, 3 जुलै 2017

जीएसटी लागू होण्यापूर्वी राज्यांना सिलिंडरवर कर देण्याची गरज नव्हती. काही राज्यांमध्ये 2 किंवा 4 टक्के व्हॅट लावण्यात येत होता. पण, आता सिलिंडरला 5 टक्के जीएसटी कराच्या श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे.

नवी दिल्ली - देशभरात वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू केल्यानंतर काही वस्तूंच्या किंमती कमी झाल्या आहेत, तर काहींच्या किंमतीत वाढ झाली आहे. पण, सर्वसामन्यांना याचा मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. कारण, घरगुती सिलिंडरच्या दरात जीएसटी लागू झाल्याने आणि अंशदानात कपात करण्यात आल्याने 32 रुपयांनी वाढ झाली आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, जीएसटी लागू होण्यापूर्वी राज्यांना सिलिंडरवर कर देण्याची गरज नव्हती. काही राज्यांमध्ये 2 किंवा 4 टक्के व्हॅट लावण्यात येत होता. पण, आता सिलिंडरला 5 टक्के जीएसटी कराच्या श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे किंमतीत 12 ते 15 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे.

याबरोबरच जूनपासून सिलिंडरवरील अंशदान कमी करण्यात आले आहे. जून महिन्यापर्यंत अंशदान म्हणून 119 रुपये जमा होत होते. पण, आता ते 107 रुपयेच खात्यावर जमा होत आहेत. या प्रकारे सिलिंडरच्या दरात 30 ते 32 रुपयांनी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

जीएसटीमुळे विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात मात्र घट झाली आहे. या सिलिंडरच्या दरात 69 रुपयांनी घट झाली आहे. यापूर्वी विनाअनुदानित सिलिंडरवर 22.5 टक्के कर लावण्यात येत होता. आता तो 18 टक्के ठेवण्यात आला आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
पेट्रोलपंप चालकांचा 12 जुलैला देशव्यापी संप
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांची दादागिरी​
चांगला कर साधासरळ ठरावा!​
#स्पर्धापरीक्षा - आय एन एस तिहायु​
भारताचा विंडीजकडून 11 धावांनी पराभव​
प्रणवदांनी वडिलांसारखी काळजी घेतली : मोदी​
चीनबरोबरील वाद: सिक्कीममध्ये लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या​
विवाहातील बचतीतून वऱहाडींना वाटली 2 हजार रोपे​
नाशिक भागात पावसाची उघडीप : शेतीकामांना वेग​