‘एल अँड टी’ला रु,705 कोटींचे कंत्राट

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मार्च 2017

मुंबई: लार्सेन व टुब्रो कंपनीला(एल अँड टी) बांधकाम क्षेत्रात तब्बल 705 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. कंपनीच्या पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन विभागाला टांझानियाच्या पाणी व सिंचन मंत्रालयाकडून हे कंत्राट प्राप्त झाले आहे. एल अँड टी आणि श्रीराम ईपीसीच्या संयुक्त भागीदारीतून या कंत्राटाचे काम पुर्ण करण्यात येणार आहे.

सध्या(11 वाजून 53 मिनिटे) मुंबई शेअर बाजारात लार्सेन व टुब्रोचा शेअर 1548.15 रुपयांवर व्यवहार करत असून 0.21 टक्क्याने घसरला आहे. दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरने वर्षभरात 1016.60 रुपयांची नीचांकी तर 1615.00 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.144,936.24 कोटींचे बाजारभांडवल आहे.

Web Title: L&T Construction bags Rs 705 cr contract in Tanzania