चीन बनावटगिरीचा बादशाह

made in china ban
made in china ban

बौद्धिक संपत्ती कायद्याचे उल्लंघन करणारा देश : अमेरिकन "वॉचडॉग'चा आरोप 

वॉशिंग्टन: बनावट साहित्य, सॉफ्टवेअर पायरसी आणि अमेरिकेच्या व्यापारासंबंधी गुप्त माहितीची सहाशे अब्ज डॉलरची चोरी झाल्याची माहिती देत अमेरिकेतील खासगी गुप्तचर संस्थांनी चीन "बनावटगिरीचा बादशाह' असल्याचा आरोप केला आहे; तसेच सर्वाधिक बौद्धिक संपत्ती कायद्याचे चीनकडून सर्वाधिक उल्लंघन होत असल्याचेही गुप्तचर संस्थांचे म्हणणे आहे.

कायदेशीर अंमलबजावणीअभावी बौद्धिक संपत्ती कायद्याचे सर्वाधिक उल्लंघन होत असून, त्यामुळे अमेरिकेला धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक; तसेच खासगी यंत्रणांकडून बौद्धिक संपत्तीची सर्वाधिक चोरी होत असल्याची माहिती नुकत्याच अमेरिकन बौद्धिक संपत्तीसंबंधी स्थापन केलेल्या आयोगाच्या अहवालात समोर आली आहे.
या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या एकूण अर्थव्यवस्थेपैकी 225 अब्ज डॉलरचा तोटा बौद्धिक संपत्तीच्या चोरीमुळे होतो. यामध्ये वस्तू वा मालाची बनावटगिरी, पायरेटेड सॉफ्टवेअर आणि व्यवसायामधील गुप्त माहितींची चोरी आदींमुळे हे नुकसान 600 अब्ज डॉलरवर जाऊन पोचले आहे.

चीनमध्ये हॅकर्सचे जाळे
मोठ्या प्रमाणावर परकी तंत्रज्ञान आणि माहितीवर ताबा मिळवून आपला व्यापार विस्तार करणे, हे चीनचे धोरण असल्यामुळे बौद्धिक संपत्तीची या देशातून सर्वाधिक चोरी होत असून, कुशल हॅकर्सचे चीनमध्ये जाळे असल्याचे या अहवालात म्हटले आहे. याचसोबत चीनच्या कलाकारांकडूनही सर्रास बौद्धिक संपत्तीची चोरी करण्यात येते. विशेष म्हणजे अमेरिकन लोकही हे चोरीचे साहित्य चीनकडून विकत घेत असतात, अशी माहिती या अहवालात नमूद करण्यात आलेली आहे. चीनमधून (हॉंगकॉंगसहित) पुरवठा करण्यात येणारा 87 टक्के बनावट माल अमेरिकेकडून जप्त करण्यात आला आहे. चीनमध्ये अमेरिकन कंपन्यांच्या गुप्त माहितीची चोरी करणारी यंत्रणा कार्यरत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com