"महिंद्रा फायनान्स'चे एनसीडी 10 जुलैपासून

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 जुलै 2017

पुणे : महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लि. अर्थात "महिंद्रा फायनान्स' या कंपनीचा अनसिक्‍युअर्ड, रिडीमेबल, नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचरचा (एनसीडी) पब्लिक इश्‍यू येत्या 10 जुलै रोजी खुला होत आहे.

हा इश्‍यू नियोजित कार्यक्रमानुसार 28 जुलै रोजी बंद होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 

हे "एनसीडी' निश्‍चित व्याजदराचे असून, तीन मालिकांमध्ये सादर केले जाणार आहेत. संस्थात्मक पात्र गुंतवणूकदार तसेच एचएनआय व छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांसाठी व्याजाचा दर वेगवेगळा असणार आहे. संस्थात्मक पात्र गुंतवणूकदारांसाठी 7, 10 व 15 वर्षांच्या मुदतीचे पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यावर अनुक्रमे 7.75, 7.90 आणि 7.95 टक्के दराने व्याज देण्यात येणार आहे.

हे व्याज वार्षिक अंतराने देय असेल. एचएनआय व छोट्या गुंतवणूकदारांसाठीदेखील 7, 10 व 15 वर्षांच्या मुदतीचे पर्याय देण्यात येत असून, त्यावर अनुक्रमे वार्षिक 7.85, 8.01 आणि 8.05 टक्के दराने व्याज देण्यात येणार आहे.

या एनसीडींना "इंडिया रेटिंग' आणि "बीडब्ल्यूआर'तर्फे "एएए' असे सर्वोच्च सुरक्षिततेचे पतमानांकन देण्यात आले आहे. कमीत कमी 25 हजार रुपये आणि त्यापुढे एक हजाराच्या पटीत गुंतवणुकीसाठी अर्ज करता येणार आहे. "प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर एनसीडींचे वाटप केले जाणार आहे. गुंतवणूकदारांना फक्त डीमॅट स्वरूपात हे एनसीडी उपलब्ध असतील. या एनसीडींचीनंतर "बीएसई'वर नोंदणी केली जाणार आहे, असे कंपनीने नमूद केले आहे.