‘मलबार गोल्ड’मध्ये मिळणार पाच टक्के ‘कॅशबॅक'

वृत्तसंस्था
शनिवार, 29 एप्रिल 2017

मुंबई: "मलबार गोल्ड अँड डायमंड्‌स'मध्ये ग्राहकांना सोने आणि हिऱ्यांच्या दागिने खरेदीवर "कॅशबॅक' मिळणार आहे. यासाठी "मलबार गोल्ड'ने स्टेट बॅंकेसोबत (एसबीआय) करार केला आहे. याअंतर्गत ग्राहकांना एसबीआयच्या क्रेडिट वा डेबिट कार्डावरुन 25 हजार रुपयांची खरेदी केल्यास पाच टक्के "कॅशबॅक' मिळणार आहे. कंपनीच्या सर्व स्टोअर्समध्ये ही योजना 29 एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे.

एसबीआय कार्डसचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय जसुजा यासंदर्भात म्हणाले, की अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर मोठ्या प्रमाणावर दागिन्यांची खरेदी होत आहे. सणासुदीच्या मुहुर्तावर ग्राहकांचा खरेदीचा अनुभव आणखी समृद्ध करण्यासाठी आम्ही ही विशेष योजना सादर केली आहे.

ग्राहकांना आकर्षक सवलती देत 30 एप्रिलपर्यंत सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 30 टक्के, तर हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 50 टक्के सूट दिली जाणार आहे. केवळ 10 टक्के रक्कम आगाऊ देऊन दागिने "बुक' करता येणार आहेत. दागिन्यांचे बुकिंग करतानाचा किंवा जो प्रचलित दर असेल तो आकारला जाईल. याशिवाय, कंपनीने आपल्या ऑनलाईन मंचावर ग्राहकांना प्रत्येक पंधरा हजार रुपयांच्या खरेदीवर दीडशे मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे मोफत देण्याची योजना सादर केली आहे. भाग्यवान ग्राहकाला एक लाख रुपयांपर्यंतचा हिऱ्याचा हारदेखील मिळू शकणार आहे. याशिवाय, ग्राहकांना सोने खरेदीवर तेवढ्याच वजनाची चांदी घरी नेण्याची आकर्षक संधी असणार आहे, असे कंपनीचे अध्यक्ष अहमद एमपी यांनी म्हटले आहे.