बँकांचे कामकाज सलग तीन दिवस बंद राहणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

मुंबई : बँकाचे कामकाज शनिवार, रविवार आणि सोमवार असे सलग तीन दिवस बंद राहणार आहे. उद्या शनिवारी (ता. 30) आणि सोमवारी (ता. 2) सार्वजनिक सुट्टी असल्याने बँका 30 सप्टेंबर ते 2 ऑक्‍टोबर या दरम्यान बंद राहणार आहेत.

सलग सुट्यांमुळे रोकड टंचाई आणि धनादेश वटण्यास विलंब होण्याची शक्‍यता असल्याने ग्राहकांना आजच बँकांची कामे उरकावी लागणार आहेत.

दसऱ्यानिमित्त शनिवारी बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. सोमवारी (ता.2) महात्मा गांधी यांची जयंतीनिमित्त राष्ट्रीय सुट्टी असून या दिवशीही बँका बंद राहतील. त्या पार्श्‍वभूमीवर गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी आजच बँकांचे व्यवहार पूर्ण करावेत, असे आवाहन बँकांकडून करण्यात आले आहे. सध्या दसऱ्यानिमित्त बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग असून बँका बंद असल्याने ग्राहकांना रोकडसाठी एटीएमवर अवलंबून रहावे लागेल.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: marathi news bank holidays in a row