मूडीजने बदलला जेटलींचा 'मूड'; विरोधकांवर हल्लाबोल

Marathi news finance news in marathi arun jaitely moodys rating
Marathi news finance news in marathi arun jaitely moodys rating

नवी दिल्ली: मूडीज या जागतिक पातळीवरील पतमानांकन संस्थेने भारताच्या मानांकनात सुधारणा केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विरोधकांवर हल्ला चढवला आहे. भारतात नरेंद्र मोदी सरकारने हाती घेतलेल्या सुधारणांच्या कार्यक्रमांवर विरोधकांनी केलेल्या टीकेचा जेटलींनी समाचार घेतला आहे. 'नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीवर टीका करणाऱ्या विरोधकांनी आत्मपरिक्षण करावे,' असा जेटलींनी टोला लगावला आहे.

मूडीज या जागतिक पातळीवरील पतमानांकन संस्थेने भारताच्या मानांकनात सुधारणा केल्याचे जेटलींनी स्वागत केले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला आणि सरकारने हाती घेतलेल्या कामाचे 'प्रमाणपत्र' असल्याचेही त्यांनी सांगितले. तब्बल चौदा वर्षांनंतर प्रथमच मुडीजने भारताचे गुंतवणूकपूरक मानांकन वाढविले आहे. मूडीजने भारताच्या मानांकनात केलेली वाढ ही मोदी सरकारने तीन वर्षांमध्ये केलेल्या कामाची घेतलेली दखल आहे. मूडीजने भारताचे क्रेडिट रेटिंग ‘बॅया3’ वरुन ‘बॅया2’ केले आहे. 

'मोदी सरकारने अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला. परिणामी अर्थव्यवस्था पारदर्शक बनली आहे. शिवाय डिजिटल इंडियावर भर देत अधिक लोकांना 'कॅशलेस' व्यवहारांकडे वळवले आहे. सरकारने अर्थव्यवस्थेला भक्कम करण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले असून कामाची पावती मिळाली आहे. शिवाय जागतिक पातळीवर नोटाबंदीच्या निर्णयाची सकारात्मक दखल घेण्यात आली आहे,’ असेही जेटली म्हणाले. जीएसटीमुळे कररचना सुटसुटीत झाली असून भारताच्या आर्थिक सुधारणांमध्ये एक मैलाचा दगड आहे,' असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com