'निती आयोगा'चे उपाध्यक्ष डॉ. अरविंद पनगारिया यांचा राजीनामा 

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : 'निती आयोगा'चे उपाध्यक्ष डॉ. अरविंद पनगारिया यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. येत्या 31 ऑगस्टपर्यंत पनगारिया 'निती आयोगा'चे काम करणार आहेत. त्यानंतर पुन्हा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. पनगारिया यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. 

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 'एनडीए'चे सरकार स्थापन झाल्यानंतर पंचवार्षिक योजना देणारे नियोजन मंडळ विसर्जित करण्यात आले होते. त्या जागी 'नॅशनल इन्स्टिट्युट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया' (निती) आयोग स्थापन करण्यात आला. या आयोगाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. अरविंद पनगारिया यांची नियुक्ती करण्यात आली होती. पंतप्रधान मोदी हे 'निती' आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. 'निती आयोग' ही संस्था सरकारचा 'थिंक टॅंक' म्हणून काम करणार आहे. केंद्र आणि राज्य स्तरावर देशाला धोरणात्मक आणि तांत्रिक सल्ला देणे हे 'निती आयोगा'चे काम आहे. 

'निती आयोगा'च्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. पनगारिया न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकविण्यासाठी जाणार आहेत.