एलपीजी गॅसची पुन्हा दरवाढ

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली : स्वयंपाकाच्या गॅसच्या (एलपीजी) दरात प्रतिसिलिंडर 4.50 रुपये वाढ करण्यात आली आहे. सरकारने स्वयंपाकाच्या गॅसवरील अंशदान बंद करण्याचे दिशेने पाऊल जुलै 2016 मध्ये उचलल्यापासून ही एकोणिसावी दरवाढ आहे. 

विनाअंशदानित गॅस सिलिंडरच्या दरात 93 रुपये वाढ करण्यात आली असून, तो आता 742 रुपयांवर गेला आहे. याआधी 1 ऑक्‍टोबरला प्रतिसिलिंडर 50 रुपये वाढ करण्यात आली होती. अंशदानित गॅस सिलिंडरच्या दरात 4.50 रुपये वाढ करण्यात आली असून, तो आता 495.69 रुपयांवर गेला आहे. 

केंद्र सरकारने गेल्या वर्षी स्वयंपाकाच्या गॅसवरील अंशदान बंद करण्याचे दिशेने पाऊल टाकले. पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्णपणे अंशदान बंद करण्यासाठी प्रत्येक महिन्यात दरवाढ करण्याचे निर्देश सरकारने तेल कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे जुलै 2016 पासून अंशदानित गॅस सिलिंडरच्या दरात 76.51 रुपये वाढ झाली. जून 2016 मध्ये अंशदानित गॅस सिलिंडरचा दर 419.18 रुपये होता. 

हवाई इंधन महागले 
हवाई इंधनाच्या दरात दोन टक्के वाढ करण्यात आली असून, ऑगस्टपासून ही सलग चौथी दरवाढ आहे. आता विमान इंधनाचा दर प्रतिकिलोलिटर 1 हजार 98 रुपयांनी वाढून 54 हजार 143 रुपयांवर गेला आहे. याआधी 1 ऑक्‍टोबरला विमान इंधनाच्या दरात सहा टक्के वाढ करण्यात आली होती.