नीरवच्या 44 कोटींच्या संपत्तीवर टाच 

नीरवच्या 44 कोटींच्या संपत्तीवर टाच 

मुंबई - पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) 11 हजार 400 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारातील मुख्य आरोपी नीरव मोदी याच्या समूहाच्या बॅंक खात्यातील 30 कोटी रुपये आणि 13.86 कोटी रुपयांचे समभाग, अशी सुमारे 44 कोटी रुपयांची संपत्ती शुक्रवारी (ता. 23) सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गोठविली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यानुसार नीरव मोदी समूहाची 30 कोटी रुपयांच्या ठेवी असलेली बॅंक खाती आणि 13.86 कोटी रुपयांचे समभाग "ईडी'ने गोठविले. मोदी, त्याची पत्नी ऍमी आणि मामा मेहुल चोक्‍सी यांना "ईडी'ने पुन्हा समन्स बजाविले आहेत. या दोघांना 26 फेब्रुवारीला "ईडी'पुढे हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. ऍमी ही अमेरिकेची नागरिक आहे. 

"ईडी'ने या गैरव्यवहाराबाबतची माहिती प्राप्तिकर विभागाकडे मागविली आहे. या प्रकरणात करचुकवेगिरी झाली का, याबाबत "ईडी' तपास करत आहे. बनावट कंपन्यांचा वापर करून या आरोपींना बेनामी मालमत्ता आणि काळा पैसा निर्माण केल्याचा संशय आहे. काल (ता. 22) "ईडी'ने मोदी समूहाच्या ठेवी, समभाग आणि आलिशान मोटारी, अशी शंभर कोटींहून अधिक मालमत्ता जप्त केली होती. 

विदेशी घड्याळे जप्त 
"ईडी'ने नीरव मोदीशी निगडित कंपन्यांवर आठवडाभरात घातलेल्या छाप्यांमध्ये मोठ्या संख्येने विदेशी बनावटीची महागडी घड्याळे, 176 स्टीलची कपाटे, 158 बॉक्‍स आणि 60 अन्य कंटेनर जप्त केले आहेत. या सर्व वस्तूंची तपासणी सुरू असून, त्यांचे मूल्यमापन करण्यात येत आहे, अशी माहिती "ईडी'च्या सूत्रांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com