मारुती सुझुकीचे बाजारभांडवल पोचले रु.2 लाख कोटींवर

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मे 2017

मुंबई: मारुती सुझुकी इंडियाच्या शेअरने आज (मंगळवार) इंट्राडे व्यवहारात 6700 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. ही शेअरची वर्षभरातील उच्चांकी पातळी आहे. कंपनीने एप्रिल महिन्यात विक्रमी मासिक विक्री नोंदवल्यानंतर कंपनीचा शेअर वधारला आहे. एप्रिल 2017 मध्ये कंपनीने 144,492 वाहनांची विक्री केली आहे. गेल्यावर्षी याच काळात (एप्रिल 2016) 117,045 वाहनांची विक्री करण्यात आली होती.

कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने आज मुंबई शेअर बाजारात मारुती सुझुकी इंडियाच्या बाजारभांडवलाने दोन लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. बाजारभांडवल शेअरच्या सध्याच्या किंमतीनुसार रु.201,609.74 कोटींवर पोचले आहे.

मारुती सुझुकीच्या सर्व श्रेणीतील वाहनांच्या विक्रीने दोन अंकी विक्रीदर गाठला आहे. मिनी सेगमेंटमध्ये विक्री (अल्टो आणि वॅगनआर) 22 टक्क्यांनी वाढली; कॉम्पॅक्ट सेगमेंट (स्विफ्ट, सेलेरियो, इग्निस, बॅलेनो, आणि डिझायर) 39 टक्क्यांपर्यंत; आणि यूटिलिटी सेगमेंटमध्ये 28 टक्क्यांची वाढ झाली आहे.

सध्या मुंबई शेअर बाजारात मारुती सुझुकीचा शेअर 6723.55 रुपयांवर व्यवहार करत असून तो 198.05 रुपयांनी म्हणजेच 3 टक्क्यांनी वधारला आहे. पाच रुपये दर्शनी किंमत असलेल्या शेअरने वर्षभरात 3730 रुपयांची नीचांकी तर 6730 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारातील किंमतीनुसार कंपनीचे रु.202,319.63 कोटी बाजारभांडवल आहे.