'एमएएस फायनान्शिअल सर्व्हिसेस'च्या शेअरची बाजारात धमाकेदार 'एंट्री'

ipo
ipo

मुंबई: बिगर बँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) एमएएस फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअरची राष्ट्रीय शेअर बाजारात 681.50 रुपयांवर नोंदणी झाली. कंपनीने निश्चित केलेल्या रु.459 या इश्यू प्राइसपेक्षा 48.47 टक्के अधिक वाढीसह शेअरची नोंदणी झाली. कंपनीने गुंतवणूकदारांना रु.459 प्रतिशेअरप्रमाणे शेअर्सचे वाटप केले होते. एमएएस फायनान्शिअलच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता.

एमएएस फायनान्शिअल सर्व्हिसेसचा आयपीओ 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान खुला होता. 2017 मध्ये आयपीओच्या माध्यमातून भांडवल उभारणी करणार्‍या आणि शेअर बाजारात चांगल्या भावावर नोंदणी होणार्‍या कंपन्यांमध्ये आता एमएएस फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअरची नोंदणी झाली आहे. त्याचबरोबर प्रताप स्नॅक्स, कॅपेसिट इन्फ्राप्रोजेक्टस्, डिक्सन टेक्नॉलॉजीज, सीडीएसएल, हडको, एव्हेन्यू सुपरमॅट्स आणि शंकरा बिल्डिंग प्रॉडक्ट या कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com