‘मक्नॉली भारत’ला रु.415 कोटींचे कंत्राट

वृत्तसंस्था
बुधवार, 15 मार्च 2017

मुंबई: मक्नॉली भारत इंजिनिअरिंगला सौर ऊर्जा प्रकल्पाचे रु.415 कोटींचे कंत्राट मिळाले आहे. कंपनीला आंध्र प्रदेशात 500 मेगावॉट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारणीचे काम मिळाले आहे. या बातमीनंतर इंट्राडे व्यवहारात शेअर 10 टक्क्यांनी वधारला होता. शेअरने इंट्राडे व्यवहारात 59.85 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे.

आंध्र प्रदेश पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडकडून हे कंत्राट मिळाले असून प्रकल्पाचे डिझाइन, अभियांत्रिकी काम, प्रकल्पाची उभारणी अशा सर्व कामांचा यात समावेश आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले.

सध्या मुंबई शेअर बाजारात 'मक्नॉली भारत' कंपनीचा शेअर 56.15 रुपयांवर व्यवहार करत असून 2.80 रुपयांनी 5.25 टक्क्यांनी वधारला आहे. दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरने वर्षभरात 45.60 रुपयांची नीचांकी तर 113.30 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.302 कोटींचे बाजारभांडवल आहे.

Web Title: McNally Bharat secures Rs415 crore solar project order in Andhra Pradesh