फ्लिपकार्ट उभारणार दीड अब्ज डॉलरचा निधी

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

मुंबई: भारतातील प्रमुख ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट नव्या गुंतवणूक फेरीत सुमारे दीड अब्ज डॉलरचा निधी उभारण्याचा विचार करीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याकरिता, कंपनीने ईबे, मायक्रोसॉफ्ट, पेपाल आणि टेन्सेन्ट या कंपन्यांशी बोलणी सुरु केली आहे.

ही फेरी यशस्वी झाल्यास कंपनीचे मूल्यांकन दहा ते बारा अब्ज डॉलरच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये यासंबंधी अंतिम निर्णय होईल. याआधी कंपनीने 50 कोटी डॉलर ते एक अब्ज डॉलरदरम्यान निधी उभारण्याची तयारी केली होती. परंतु आता ही रक्कम दीड अब्ज डॉलरवर नेण्यात आली आहे.

कंपनीचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमुर्ती यांच्या कारकिर्दीत कंपनीच्या व्यवसायाची उलाढाल वाढल्याने कंपनीने मोठ्या प्रमाणावर निधी उभारण्यास पुढाकार घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. परंतु कंपनी आणि गुंतवणूकदारांमध्ये एकमत न झाल्यास भांडवल उभारणीची योजना बारगळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याआधी कंपनीची पाच कंपन्यांशी बोलणी फिस्कटल्याचेही सूत्रांनी सांगितले.

गेल्यावर्षी(2015) टायगर ग्लोबल मॅनेजमेंट आणि कतार इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटीने फ्लिपकार्टमध्ये सुमारे 70 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली होती. त्यानंतर कंपनीला गुंतवणूकदार मिळण्यास अडचणी येत आहेत.

फ्लिपकार्टने क्लाऊड सेवांसाठी मायक्रोसॉफ्टसोबत भागीदारी केली आहे. फ्लिपकार्ट आता माइक्रोसॉफ्टच्या क्लाउड प्लॅटफॉर्मचा वापर करणार आहे. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी या कराराची घोषणा केली होती.

Web Title: Microsoft forges cloud partnership with Flipkart to take on Amazon’s AWS