पैशाच्या गोष्टी: मन करा रे प्रसन्न…

 पैशाच्या गोष्टी: मन करा रे प्रसन्न…

आजपर्यंत पैशाच्या अनेक वाटांबद्दल बरीच चर्चा झाली आहे. आपल्याला पुरेसे पैसे मिळावेत की ज्यामुळे आपले जीवनमान उंचावेल व आपला निवृत्तीनंतरचा काळ सुखात जाईल, हा यामागील उद्देश असतो; परंतु मिळविलेल्या पैशांचे नियोजन करण्यासाठी निश्‍चितच गुंतवणूकदाराचे मन किंवा बुद्धी काम करीत असते. तुकाराम महाराज जे म्हणतात की, "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण' हे खरोखरच ब्रह्मवाक्‍य आहे. कसे ते आता आपण बघुयात.

एक वेळ पैसे मिळवणे सोपे आहे; परंतु त्याचे नियोजन करून त्यानुसार कृती करणे, कृतीचा वेळोवेळी आढावा घेणे, भविष्यात काही बदल करणे, हेच अधिक अवघड असते; पण हे केले तरंच असलेल्या पैशातून अधिक पैसे मिळविण्याच्या संधी प्राप्त होतात. आता एवढी शिस्त पाळण्यासाठी मनावर नियंत्रण आवश्‍यक आहे. अधिक लाभ मिळविण्यासाठी संतुलित पोर्टफोलिओ करावयाचा तर मनाने काही निर्णय त्वरित घेतले तरच त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होऊ शकते. "जाऊ दे! राहू दे!' अशी वृत्ती जोपासली तर फार महत्त्वाच्या संधी हातातून निसटतात याचा अनुभव शेअर बाजारातील गुंतवणूकदार अनेकदा घेतात.

आजवर इक्विटी या ऍसेट क्‍लासमधून सर्वांत जास्त परतावा मिळाला आहे. ज्या व्यक्तीला आपले मन स्थिर आणि शांत ठेवता येते, तिला नक्कीच यश मिळते. जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि इन्वेस्टमेंट गुरू म्हणून ख्याती असणारे वॉरेन बफे म्हणतात की, शेअर बाजारात साधारण बुद्धिमत्ता असणारा, परंतु अधिक संतुलित (राइट टेम्परामेंट) मानसिकता असणारा गुंतवणूकदार फार उत्तम कामगिरी करू शकतो. ते म्हणतात "बी ग्रीडी व्हेन एव्हरीवन इज फीअरफुल अँड बी फीअरफुल व्हेन एव्हरीवन इज ग्रीडी'. अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर 8 नोव्हेंबरच्या नोटाबंदीनंतर सेन्सेक्‍स 25800 अंशांच्या पातळीपर्यंत येऊन आज 28200 अंश इतका आहे. म्हणजे अवघ्या महिन्यात 9.30 टक्के परतावा!! म्हणजे तेव्हा जे लोक भीतीमध्ये "ग्रीडी' झाले, ते आज मजेत आहेत. थोडक्‍यात, कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर फार अतिउत्साही किंवा निरुत्साही असून चालत नाही.

पुढील काही गोष्टी केल्या तर त्याचा अधिक आर्थिक लाभ होईल :

  • हाती पैसा आला की आधी थोडा ताबा ठेवून पहिली बचत केली जाईल.
  • एफ.डी. व पोस्टाशिवाय वेगळ्या पर्यायांचा विचार करावा.
  • या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे.
  • दर महिन्याला आपल्या पोर्टफोलिओचा आढावा घेत राहावा.
  • शेअर बाजारात अतिशय डोळसपणे गुंतवणूक करावी आणि मग बाजारात घसरण झाली तरी घाबरू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com