‘मुद्रा’मध्ये 12 कोटी जणांना 6 लाख कोटींचे कर्जवाटप

पीटीआय
बुधवार, 30 मे 2018

नवी दिल्ली - सरकारने सुरू केलेल्या मुद्रा योजनेत १२ कोटी जणांना बॅंका आणि वित्तीय संस्थांकडून ६ लाख कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिली. 

मुद्रा योजनेतील लाभार्थ्यांशी पंतप्रधान मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. मोदी म्हणाले, ‘‘योजनेतील १२ टक्के लाभार्थ्यांपैकी २८ टक्के म्हणजेच ३.२५ कोटी प्रथमच उद्योग सुरू करणारे आहेत. एकूण लाभार्थ्यांपैकी ७४ टक्के म्हणजेच ९ कोटी महिला आहेत आणि ५५ टक्के अनुसूचित जाती व जमाती आणि इतर मागास वर्ग गटातील आहेत.

आधीच्या सरकारने केवळ कर्ज मेळावे घेतले, मात्र कर्ज ठरावीक लोकांनाच देण्यात आले. त्या वेळी ते कर्ज वसूल कसे होईल, याचा विचारही करण्यात आला नव्हता.’’ 

पंतप्रधान मुद्रा योजनेची सुरवात पंतप्रधान मोदी यांनी ८ एप्रिल २०१५ ला केली. यात बिगरशेती लघु व मध्यम उद्योजकांना दहा लाख रुपयांचे कर्ज देण्यात येत आहे. पंतप्रधानांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज महाराष्ट्र, कर्नाटक, आसाम, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्‍मीर आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांमधील मुद्रा योजनेतील लाभार्थ्यांनी संवाद साधला.

Web Title: mudra scheme loan distribution