‘जिओ’मुळे अंबानी फोर्ब्जच्या ‘ग्लोबल गेम चेंजर्स’ यादीत

वृत्तसंस्था
बुधवार, 17 मे 2017

अंबानींच्या या प्रयत्नामुळे त्यांचा 'ग्लोबल गेम चेंजर्स'च्या यादीत समावेश झाला आहे. तेल उत्खनन क्षेत्रातील मोठी असामी असलेल्या मुकेश अंबानींनीं टेलिकॉम क्षेत्रात दणक्यात प्रवेश केला आहे. सहा महिन्यात जिओने 10 कोटी ग्राहकांचा टप्पा गाठला आहे.

न्यूयॉर्क: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे फोर्ब्जच्या 'ग्लोबल गेम चेंजर्स' यादीत समावेश झाला आहे. मुकेश अंबानी आपल्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडून आणत आहे. त्यामुळे जगभरातील कोट्यवधी लोकांच्या जीवनमान बदलत आहे. रिलायन्सने वर्षभरापुर्वी सादर केलेल्या 'जिओ'मुळे भारतात कोट्यावधी लोकांना इंटरनेटचा वापर करता येणे शक्य झाले. कोट्यावधी लोकांना इंटरनेटवर आणण्यासाठी अंबानी यांनी प्रयत्न करत आहेत.

अंबानींच्या या प्रयत्नामुळे त्यांचा 'ग्लोबल गेम चेंजर्स'च्या यादीत समावेश झाला आहे. तेल उत्खनन क्षेत्रातील मोठी असामी असलेल्या मुकेश अंबानींनीं टेलिकॉम क्षेत्रात दणक्यात प्रवेश केला आहे. सहा महिन्यात जिओने 10 कोटी ग्राहकांचा टप्पा गाठला आहे.

भारतीय टेलिकॉम क्षेत्रात जिओने प्रवेश केल्यापासून स्पर्धक कंपन्यांना जोरदार टक्कर दिली आहे. मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओच्या आकर्षक योजनांमुळे आयडिया, एअरटेल, बीएसएनएल आणि व्होडाफोन सारख्या दिगज्ज कंपन्यांना मोठा फटका बसला आहे.

फोर्ब्जच्या यादीत सौदी अरबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, 'डायसन' कंपनीचे संस्थापक जेम्स डायसन, आफ्रिकेतील रिटेल उद्योजक क्रिस्टो वीजे आणि अमेरिकी ग्लोबल इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन ब्लॅक रॉकचे संस्थापक लॅरी फिंक यांचा देखील समावेश आहे.

आज मुंबई शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 1354.45 रुपयांवर व्यवहार करत असून तो 1.95 रुपयांनी वधारला आहे. दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरने वर्षभरात 925.70 रुपयांची नीचांकी तर 1465 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.440,244.39 कोटींचे बाजारभांडवल आहे.