‘जीएसटी’मुळे विकासदर वाढेल - गोदरेज

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

मुंबई - वस्तू आणि सेवा करामुळे (जीएसटी) पुढील सहा महिन्यांत एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढेल, असा विश्‍वास ज्येष्ठ उद्योजक आदी गोदरेज यांनी व्यक्त केला आहे. भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात गोदरेज बोलत होते. 

‘जीएसटी’ने विकासाला चालना मिळणार आहे. ‘जीएसटी‘च्या अंमलबजावणीनंतर सुरवातीला काही अडथळे येतील, मात्र ते दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे गोदरेज यांनी सांगितले. ‘जीएसटी‘बाबत सरकार सकारात्मक आहे. येत्या सहा महिन्यांत ‘जीएसटी‘मुळे ‘जीडीपी’त वाढ  होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

‘जीएसटी‘तील वेगवेगळ्या कर स्तराबाबत गोदरेज म्हणाले, की ‘जीएसटी’मध्ये एक किंवा दोन प्रकारचे कर असतील, अशी अपेक्षा नागरिकांनी केली होती. प्रत्यक्षात पाच स्तरांमध्ये ‘जीएसटी’ची निश्‍चिती झाली. मात्र सर्वसामान्यांच्या वापरातील बहुतांश वस्तूंचा किमान कर स्तरात समावेश केला आहे. सामान्यांचा सारासार विचार करून हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. खासगी क्षेत्राने अर्थव्यवस्था उभारण्यास हातभार लावला आहे. उद्योगांना मुक्त वातावरण निर्माण केल्याने खासगी क्षेत्राला फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. कृषीसह कृषी आधारित प्रक्रिया उद्योगात प्रचंड संधी असून, याला प्रोत्साहन दिल्यास विकासाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.