प्रभात डेअरीच्या ‘कन्झ्युमर बिझनेस हेड’ पदासाठी मुथर बाशा यांची नियुक्ती

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

मुंबई: प्रभात डेअरीच्या ग्राहक व्यवसाय(कन्झ्युमर हेड्स) प्रमुखपदी मुथर बाशा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाशा यांच्या गाठीशी हिंदुस्थान युनिलिव्हर आणि ब्रिटानियासारख्या आंतरराष्ट्रीय एफएमसीजी संघटनांमध्ये 25 वर्षांहून अधिक काळ सेल्स आणि कस्टमर मार्केटिंग क्षेत्रातील अनुभव आहे.

मुंबई: प्रभात डेअरीच्या ग्राहक व्यवसाय(कन्झ्युमर हेड्स) प्रमुखपदी मुथर बाशा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाशा यांच्या गाठीशी हिंदुस्थान युनिलिव्हर आणि ब्रिटानियासारख्या आंतरराष्ट्रीय एफएमसीजी संघटनांमध्ये 25 वर्षांहून अधिक काळ सेल्स आणि कस्टमर मार्केटिंग क्षेत्रातील अनुभव आहे.

प्रभातमध्ये पदभार सांभाळण्यापूर्वी बाशा हे अमेरिकेच्या गोल्डमन सॅक्स आणि जपानच्या मित्सुईचा पाठिंबा असलेल्या ग्लोबल कन्झुमर प्रोडक्‍ट्‌स लिमिटेड या कंपनीत जनरल मॅनेजर आणि सेल्स विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्याठिकाणी बाशा यांच्यानंतर गोदरेज कन्झुमर प्रोडक्‍टसचे एमडी श्री. ए महेंद्रन यांनी पदभार सांभाळला. ते संघटनेच्या महत्त्वाच्या टीमचा भाग असतील आणि संपूर्ण जीटीएम (गो टू मार्केट)ची धुरा सांभाळतील.

"आपला कन्झुमर बिझनेस झपाट्याने वाढावा अशी प्रभातची महत्त्वाकांक्षा आहे. भारतात व्यापार वृद्धीच्या मोठ्या संधी आहेत. प्रभातची दूध मिळवण्याची प्रक्रिया आणि निर्मितीमधील हातोटीचे मिश्रण बेमालूम आहे, त्यामागे 'पार्टनर्स इन प्रोग्रेस'चे भक्कम तत्वज्ञान आहे असा आमचा ठाम विश्वास आहे. आता उद्योगक्षेत्रातले नावाजलेले श्री. बाशा यांनी कारभार हातात घेतला असल्याने कन्झुमर बिझनेसमध्ये मोठा बदल दिसून येईल. श्री. बाशा यांचा तगडा अनुभव येत्या काळात प्रभातचा कायापालट करण्यात मोलाचा ठरेल अशी आम्हाला आशा आहे, असे कंपनीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक विवेक निर्मल यांनी सांगितले.

बाशा यांनी ब्रिटानिया इंडस्ट्रीज (भारत-पूर्व) मध्ये रिजनल सेल्स मॅनेजर म्हणून कार्यभार सांभाळला होता. तसेच त्यांच्याकडे नेपाळ व बांगलादेशच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या होत्या. ब्रिटानियाचा सर्वात मोठा पूर्व भूभागात अभूतपूर्व कामगिरी बजावण्यात बाशा यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांनी टॉप आणि बॉट्‌म लाईनवर विकास केला तसेच बाजारातही फायदा कमावला.